युपीएलने उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी श्रीनाथ म्हस्कोबा शुगर मिलसोबत केला समझोता करार
पुणे : ‘शेतकरी सर्वप्रथम‘ या दृष्टिकोनासह पर्यावरणानुकूल, शाश्वत शेती उत्पादने व उपाय, सुविधा प्रदान करणारी जागतिक स्तरावरील कंपनी युपीएल लिमिटेडने उसाचे शाश्वत उत्पादन करण्यासाठी श्रीनाथ म्हस्कोबा शुगर मिलसोबत एक समझोता करार केला आहे. या करारांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या दूर केल्या जातील आणि नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम उपयोग करत सस्टेनेबल शुगर (पर्यावरणानुकूल साखर) ही कॅटेगरी निर्माण केली जाईल. या सहयोगाच्या माध्यमातून आणि क्रांतिकारी झेबा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने युपीएलने १०,००० एकरांहून जास्त शेतीमध्ये उसाचे उत्पादन १५% नी वाढवण्याबरोबरीनेच कच्च्या मालावरील खर्चात घट करण्याचे देखील उद्दिष्ट आखले आहे, यामुळे शेतकऱ्यांचा नफा आणि कमाई वाढेल. या अभियानामुळे ७०हुन जास्त गावांमधील ४,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळेल.
साखर उद्योगक्षेत्रात पाणी, कच्चा माल, वीज, कामगार आणि इंधन यासारख्या अनेक संसाधनांची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. वापर बराच जास्त असून देखील प्रत्येक हितधारकाला त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणारे लाभ मात्र कमी असतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत, खराब पिके, गुंतवणूक खर्चात वाढ, कामगार न मिळणे, यांत्रिकीकरण, वीज आणि पाण्याची कमतरता, शेतीविषयी सल्ल्यामधील समस्या, पिकांची गॅरंटी न मिळणे इत्यादींमुळे तयार ऊस मिळण्यात उशीर होतो. याव्यतिरिक्त, एका बाजूला पर्यावरणानुकूल (सस्टेनेबल) साखरेची वाढती मागणी आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचा अपव्यय, पोषण वाया जाणे, वीज खूप जास्त वापरली जाणे या चिंता देखील शेतकऱ्यांना भेडसावत असतात.
या समस्या, चिंता दूर करण्यासाठी युपीएलने झेबा तंत्रज्ञान विकसित केले आहे. झेबा नैसर्गिक पद्धतीने उत्पन्न, स्टार्चवर आधारित, पूर्णपणे बायो डिग्रेडेबल, उत्कृष्ट शोषक आहे. इन-फरो ऍप्लिकेशनसाठी तयार करण्यात आलेले झेबा तंत्रज्ञान मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते, पिकांची मुळे जिथे असतात त्या भागात पोषक तत्त्वांच्या वापराच्या क्षमतेमध्ये सुधारणा करते आणि मातीच्या मायक्रोबायोमवर सकारात्मक प्रभाव निर्माण करते, यामुळे मातीचे आरोग्य टिकून राहते. हे आपल्या स्वतःच्या वजनाच्या ४५० पट पाणी शोषून पिकांच्या आवश्यकतेनुसार ते सोडू शकते. त्याचा प्रभाव मातीमध्ये सहा महिन्यांपर्यंत टिकून राहतो आणि मातीमध्ये नैसर्गिक पद्धतीने व कोणतेही नुकसान न करता त्याचे विघटन होते. अशाप्रकारे पिकांमध्ये पाणी कमी प्रमाणात वापरले जाते, ज्यामुळे शेतीचा जल पदभार (वॉटर फूटप्रिंट) कमी होतो. यामुळे भविष्यात सिंचनासारख्या कामांमध्ये विजेचा वापर देखील कमी होतो. तसेच पुढे जाऊन पिकांच्या उपयोगासाठी पोषक तत्त्वांच्या अणूंचे शोषण पोषके वाया जाण्याचे प्रमाण कमी करते, यामुळे दर एकरी खतांच्या उपयोगाचे प्रमाण कमी होते.
झेबा तंत्रज्ञानाच्या मदतीने ६०० कोटी लिटर पाणी आणि ५०० मेट्रिक टन युरियाची बचत करण्याचे युपीएलचे उद्दिष्ट आहे. २०२१ मध्ये उसाच्या शेतीसाठी उत्तर प्रदेशातील १० आणि महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये २५००० एकर शेतांमध्ये १२५०० शेतकऱ्यांनी झेबाचा वापर केला. यामुळे प्रचंड प्रभाव निर्माण झाला. पिकांमध्ये ५०% वाढ झाली, पिकांचे प्रमाण दर एकरी सरासरी ३५-४० टनांपासून ५० ते ८० टनांपर्यंत वाढले.
या करारानुसार उसाच्या पर्यावरणानुकूल, शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना शेतीविषयक चांगल्या पद्धती (जीएपी) विषयी सल्ला, प्रोनुटीवा (पिकांचे संपूर्ण संरक्षण व पोषण पॅकेज), प्लांटर्ससंदर्भात यांत्रिकीकरण, अर्थिंग अप मशिन्स व बूम स्पेयर्स, Nurture.farm ऍपमार्फत विमा आणि ट्रेसेबिलिटीच्या शाश्वत सुविधा देखील प्रदान केल्या जातील. हे अभियान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चालवले जाईल, जे पुढे जाऊन शेतकऱ्यांना ऊस नर्सरी (उसाचे बीज) स्थापन करण्यात मदत करेल, हे बीज ते दुसऱ्या शेतकऱ्यांना विकू शकतील.
