Tuesday, June 16, 2026
Latest NewsSportsTOP NEWS

नीरज चोप्राने नोंदवला नवा विक्रम

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलँडमधील ‘पावो नुर्मी गेम्स 2022’ मध्ये स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. पण त्याला सुवर्णपदक जिंकता आलं नाही. या स्पर्धैत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

नीरज चोप्रा फिनलँडमधील पावो नुर्मी गेम्स 2022 मध्ये सहभागी झाला आहे. या स्पर्धेत त्याने 89.30 मीटर लांब भालाफेक करत टोकियो ऑलिम्पिकमधील स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने 87.58 मीटर लांब भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले होते. वर्ल्ड ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये पावो नुर्मी एक मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत फिनलँडच्या ओलिव्हर हेलेंडरला सुवर्णपदक मिळाले. त्याने 89.93 मीटर लांब थ्रो केला.

टोकियो ऑलिम्पिकनंतर 10 महिन्यांनी नीरज चोप्रा प्रथमच या स्पर्धेत उतरला आहे. नीरज पुढच्या शनिवारी फिनलँडमध्ये होणाऱ्या कोर्टेन खेळांमध्येही सहभागी होणार आहे. 30 जूनला स्टॉकहोम लेग ऑफ द डायमंड लीगमध्येही तो जाणार आहे. फिनलँडमध्ये पोहोचण्याआधी नीरजने युएसए आणि तुर्कीत प्रशिक्षण घेतलं होतं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading