Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पाहोचवा – राजीव चंद्रशेखर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने तंत्रज्ञानाच्या साहायाने देशातील भ‘ष्टाचार संपविला. त्यामुळे खर्‍या लाभार्थ्यांपर्यत गरीब कल्याणासाठीचा निधी पोहोचत आहे. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी घरोघरी संपर्क करावा असे आवाहन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या सरकारच्या अष्टवर्षपूर्तीनिमित्त वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपचा बूथ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात चंद्रशेखर मार्गदर्शन करत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक कार्यक‘माच्या अध्यक्ष स्थानी होते.
माजी आमदार बापूसाहेब पठारे, सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, योगेश मुळीक, अनिल टिंगरे, ऐश्वर्या जाधव, संतोष खांदवे, संतोष राजगुरु, नीहाल घोडके, राजू बाफना, प्रताप मोहिते, नितिन जाधव, विजय चौगुले, ज्योती जवळकर, आशाताई जगताप, चंद्रकांत जांजिरे, अन्वर पठाण, स्वप्निल ऊंद्रे, किशोर वाघमारे, दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ हा नारा प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने बूथ कार्यकर्त्यांचे मेळावे महत्त्वाचे आहेत. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान किसान योजना, डिजिटल रुपया, यूपीआय, आयुष्मान भारत अशा केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, मोदी सरकारचे महत्त्वाचे निर्णय मतदारांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे चंद्रशेखर म्हणाले.
मुळीक म्हणाले, शहर भाजपच्या बूथ स्तरापर्यंतच्या सर्व रचना पूर्ण झाल्या आहेत. भाजपने पुणे शहरात महापालिकेच्या माध्यमातून पुढील 25 वर्षांची शहराची गरज लक्षात घेऊन चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मोदी सरकारमुळे शहराच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading