Sunday, April 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

जीएसटीचे पैसे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी नाहीत – अजित पवारांनी भाजपला सुनावलं

पुणे : जीएसटीचे पैसे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यासाठी आले नाहीत. पेट्रोल डिझेलचे दर आम्ही सुद्धा कमी केलेत. मागच्या काळात येणारे पैसे आता आले आहेत. त्याचा आणि याचा काही एक संबंध नाही, असे रोखठोक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यावरून भाजपकडून सातत्याने महविकास आघाडी सरकारवर टीका करत असते. इंधनाचे दर कमी करा, असे म्हटले तर, हे जीएसटीच्या थकीत परताव्यावर बोलत असतात, असा आरोप भाजकडून नेहमी करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे.

विकासकामांसाठी हे जीएसटीचे पैसे आहेत. या पैशांचा योग्य ठिकाणीच वापर झाला पाहिजे. जीएसटीचे १५ हजार कोटी येणे अजूनही बाकी आहे. आता आलेले पैसे हे मागील थकबाकी आहे. ते टप्प्या टप्प्याने येत आहेत. राहिलेले उर्वरित पैसे लवकर द्यावेत ही माफक अपेक्षा. एकूण २९ हजार कोटी रुपये येणे बाकी होते.

भाजपच्या आरोपावर अजित पवार म्हणाले, जीएसटीचे आलेले पैसे हे इंधनदर कपातीसाठी आलेले नाही. राज्यात इतरही अनेक समस्या आहेत. शेवटी राज्याचा गाडा ही नीट चालला पाहिजे. अनेक गरजू लोक आहेत त्यांच्या समस्या आहेत. त्या सोडण्यासाठी या पैशाचा वापर करता येईल, असेही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading