Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच व डाॅ.विभा दाधीच यांना विमल -भास्कर पुरस्कार २०२२ जाहीर

पुणे : नामवंत नृत्य संस्था डाॅ.नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी च्या वतीने मध्य प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय कीर्ती चे प्रसिद्ध कथक कलाकार महामहोपाध्याय पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच (वय ८१) व डाॅ.विभा दाधीच यांना ‘विमल भास्कर’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

येत्या दि. ५ जुन रोजी सायंकाळी ५ वाजता पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच व डाॅ.विभा दाधीच यांना विमल भास्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, शाल, हार, बुके व रूपये पंचवीस हजार रोख असे आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर डाॅ.पुरू दाधीच नृत्य प्रात्यक्षिक व आपल्या सहकाऱ्यांसह कथक नृत्य प्रदर्शन करणार आहेत.या नृत्य कार्यक्रमात डाॅ.विभा दाधीच, हर्षिता दाधीच, पियुष राज आदी कथक कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

डाॅ.पुरू दाधीच यांना पद्मश्री पुरस्कार (२०२०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार(२०१८), भारत सरकार तर्फे टैगोर फेलोशिप, मध्य प्रदेश सरकार चा शिखर सम्मान अशा अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांनी कथक नृत्यावर अनेक पुस्तके लिहीली आहेत. संपूर्ण भारतात कथक नृत्याच्या परीक्षा देणारे विद्यार्थी केवळ डाॅ.पुरू दाधीच यांचीच पुस्तके वाचत असतात.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading