Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

संकल्पनेच्या नावाखाली स्मारकांवर लावण्यात आलेले नामफलक आठ दिवसात हटवा – राष्ट्रवादी कॉंग्रेस

पुणे : कामापेक्षा दिखाऊपणा व चमकोगिरीवरच अधिक भर देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपुरुषांची पुतळे- स्मारके यांवर संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावण्याचा जो लाजीरवाणा प्रकार सुरू केला आहे, तो त्वरित बंद करावा. पुणेकर व राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही. सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर लावण्यात आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या नामफलकाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत हे नामफलक हटविले गेले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटविण्याचे काम करतील, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेत सत्तेत असताना मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाला कोणतीही ठोस कामगिरी करता आली नाही. पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी सोयी, नवीन आस्थापनांची उभारणी अशा सर्वच आघाड्यांवर भाजपला अपयश आले आहे. कामापेक्षा दिखाऊपणा आणि चमकोगिरीवरच भर देण्याच्या भाजपच्या या प्रवृत्तीचा झालेला पर्दाफाश पुणेकरांनी पाहिला आहे. अलीकडे तर राष्ट्रपुरुषांची पुतळे – स्मारके यांपेक्षाही स्वत:चे कर्तृत्व मोठे असल्याचे भाजपकडून दाखवून दिले जात आहे. संकल्पनाच्या नावाखाली स्वत:चा डंका वाजवून घेण्याचा प्रकार घडत आहे.

सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर भाजपच्या एका माजी नगरसेवकाने संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिका आयुक्त मा. विक्रम कुमारजी यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसांत हे नामफलक हटविण्यात आले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटवतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. या महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल, तेव्हा ही संकल्पनेची संकल्पनाच आम्ही हद्दपार करणार आहोत.

या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, संतोष नागरे, विपुल म्हैसुरकर, किशोर कांबळे, संतोष पिसाळ, समीर पवार, प्रदीप शिवचरण, हेमंत गायवाड, विक्रम जाधव, शिवम इभाड, अभिजीत बारवकर, दिनेश खराडे, वैशाली थोपटे, श्वेता होनराव, सारिका पारेख, अनिता पवार, भावना पाटील, शिल्पा भोसले, शालिनी जगताप, भक्ती कुंभार, ललिता मोरे, शालन उभे, मोनाली गोडसे, स्वाती जाधव, भक्ती कुंभार, तृप्ती पोकळे, मनीषा होते, उर्मिला गुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading