भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी मोर्चा

भारतीय जनता पार्टी पुणे शहर आणि महाराष्ट्र प्रदेश

पुणे: भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा प्रमुख . योगेश आण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे समोर ओबीसी आरक्षणावरुन जोरदार आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली.
मध्यप्रदेशनी मिळविले आणि महाराष्ट्राने गमविले,स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण संपुष्टात आलेले आहे.

ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ऊदया शुक्रवारी पुणे येथे 21 मे 2022 रोजी बांठिया आयोगासमोर याबाबतीत डेमो सादर करून,ओबीसी आणि भटके विमुक्तांचे आरक्षण कसे मिळविता येईल याचे सादरीकरण करणार असल्याचे प्रमुख नेत्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी ओबीसी मोर्चा पुणे शहर च्या वतीने दिपक माने, दिनेश नायकु,संतोष शिंदे, नंदकुमार गोसावी,शंतनु नारके,यशोधन आखाडेबापु नाईक, स्मिता गायकवाड, विकी ढोले, दिनेश रासकर,तुषार रायकर,विक्रम फुंदे, नवनाथ भुजबळ, संदिप कर्डेकर, सागर धोञे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: