Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते.
काही कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या स्थगितीचं कारण अस्पष्ट आहे. मनसेकडून अद्याप याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती.
मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मनसेने दिला होता.यासंदर्भातले बॅनर मुंबईतल्या लालबाग परिसरात लावण्यात आले होते. या बॅनरमुळे आता मनसेही उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं पाहिला मिळत होते.
हा दौरा स्थगित झाल्याने वादावर तात्पुरता तोडगा पडला आहे. तब्येतीच्या कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित केल्याचे समजते. डॉक्टरांच्या सल्लानंतर या दौऱ्याबाबत लवकरच मनसेकडून माहिती देण्यात येणार आहे.
राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येत राजकारण करण्यासाठी येत नसून प्रभू रामाच्या दर्शनासाठी येत आहेत. रामनगरी अयोध्येत आपण स्वतः त्यांचे स्वागत करू. त्यांना विरोध करणारे भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह ना आवरावे, अशा मागणीचे पत्र महाकाल मानव सेवा संस्थेच्या साध्वी कंचन गिरी व अन्य साधू महंतांनी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading