दुचाकींच्या शहरात आता ईव्ही प्लॅनेट ची सुरुवात

पुणे : ईव्ही प्लॅनेट या ईव्ही उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करुन देणार्‍या पुण्यातील पहिल्या अशा स्टोअर ची सुरूवात आज करण्यात आली. पुणे हे शहर म्हणजे उपखंडातील सर्वांत मोठी दुचाकीची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द असून या शहरात आता पहिल्यावहिल्या अशा ईव्ही दुचाकींचे केंद्र तसेच सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड्सच्या दुचाकी एकाच ठिकाणी उपलब्ध करणारे स्टोअर सुरू करण्यात आले आहे.

ईव्ही प्लॅनेट हा ईव्हीची सर्व उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठीचा एक मंच आहे. हे एक महत्त्वपूर्ण स्टोअर असून या स्टोअर मध्ये स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सर्व ईव्ही उत्पादने तसेच ईव्ही दुचाकींसाठीचे सर्व पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.  ईव्ही उत्पादने आणि सेवांची शहरातील वाढती गरज आता या नवीन स्टोअर मुळे पुर्ण होण्यास मदत होईल.  हे स्टोअर मंगलदास रोड वरील हर्मिस कुंज येथे आहे.

या स्टोअर च्या माध्यमातून ई प्लॅनेट ने पुणेकरांसाठी आता संपूर्ण भारतात उपयोगासाठी चाचणी करण्यात आलेली सर्व उत्पादने उपलब्ध केली आहेत. गुणवत्ते साठी त्यांच्या कडून अतिशय कठोर गुणवत्तेची चाचणी होऊन गुणवत्ता,विश्वसनीयतेने युक्त सूटे भाग आणि सेवां बरोबरच सर्टिफाईड बॅटरीज व संबंधित उत्पादनांची श्रेणी उपलब्ध आहे.

ईव्ही प्लॅनेट ने देशभरातील तसेच जगभरांतील सर्वोत्कृष्ट ईव्ही कंपन्यां बरोबर सहकार्य केले असून यामुळे ग्राहकांना ही उत्पादने कार्यक्षमतेच्या, विश्वसनीयतेच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. त्यांच्या कडून ग्राहकांना त्यांच्या गरजे नुसार योग्य ईव्हीची निवड करण्यास सहकार्य केले जाणार असून कारण ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार ईव्हीचा वापर कसा करावा हे समजावले जाते कारण ईव्ही बाजारपेठ सध्या खूपच सुरूवातीच्या स्तरावर आहे.

या सुरुवातीच्या विषयी बोलतांना ईव्ही प्लॅनेट चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मोहनीश अरोरा यांनी सांगितले “ आमच्या या महत्त्वपूर्ण स्टोअर च्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना त्याच्या ईव्हीच्या गरजेनुसार उपाय सुचवत आहोत. काही काळापासून आम्ही हे जाणले आहे की ईव्ही कडे वळणे एक चांगली गोष्ट आहे.  ईव्हीज आणि त्यांच्या सेवांची मोठी मागणी असून वाढीच्या ही संधी उपलब्ध आहेत.   तरीही, यामध्ये एक गोष्ट कमी आहे ती म्हणजे भारतीय रस्त्यांसाठी कोणती योग्य आहे आणि उत्पादने कोणती आहे याबाबत जागरुकतेचा अभाव आहे. ईव्ही प्लॅनेट च्या माध्यमातून आम्ही एक कंपनी म्हणून लोकांना शिक्षण देऊन आणि इलेक्ट्रिक वाहनांबद्दल ची मानसिकता बदलून त्याचे लाभ समजावून सांगण्याचा प्रयत्न करू.”

बजाज फिनसर्व्ह चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी सांगितले “शहरातील कार्बनमुळे होणारे प्रदुषण कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम इलेक्ट्रिक वाहने करतात.  मग वाहनांची आवड असणारे लोक असोत किंवा साधारण नागरिक, ईव्हीचा वापर रोखणे अशक्य गोष्ट आहे.  ईव्ही प्लॅनेटचे उद्घाटन करतांना मला आनंद होत असून भारतीय आणि बहुराष्ट्रीय उत्पादकांची विश्वसनीय आणि आकर्षक उत्पादने देण्याच्या त्यांच्या मिशनला मी शुभेच्छा  देतो. बजाज फिनसर्व्ह या क्षेत्रात आधीपासूनच महत्त्वपूर्ण काम करत आहे आणि आम्ही आता ईव्ही प्लॅनेटच्या ग्राहकांना वित्तीय क्षेत्रात अजोड अनुभव देऊ.”

ईव्ही प्लॅनेट ने स्वीच सायकल्स, ई-मोटरार्ड, फिल्डे इलेक्ट्रिक, एक्सर एनर्जी, मोटोव्होल्ट, रोव्वेट मोबिलिटी, कबीरा मोबिलिटी, जॉय ई बाईक्स, डेटेल इंडिया, शेमा इलेक्ट्रिक एन्ड सोलर, रेव्होल्युशन वर्क्स युके, व्होल्टा बॅटरीज आणि आरईप्लस बॅटरीज आणि अशाच अन्य काही कंपन्यांबरोबर सहकार्य केले आहे.

या स्टोअर मध्ये वैविध्यपूर्ण जगभरांतील उत्पादकांच्या रायडिंग एक्सेसरीजही ठेवण्यात येत आहेत.  यामध्ये रायडिंग गिअर, हेल्मेट्स, बाईक लाईट्स, बेल्स,बॅग्ज, सन ग्लासेस, स्मार्ट वेअरेबल्स आणि टॉप बॉक्सेस चा समावेश आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: