१८वी राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा गुरुवारपासून

मुलांचे २४ तर मुलींचे १६ संघ सहभागी : बालेवाडी स्टेडियम येथे भरणार स्पर्धा

पुणे : राष्ट्रीय रोलबॉल संघटना, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व पुणे जिल्हा रोलबॉल संघटना यांच्या वतीने ‘१८ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय रोलबॉल’ स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे १९ ते २२ मे दरम्यान रंगणार असल्याची माहिती स्पर्धा अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे, राष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन १९ मे २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता क्रिडा व युवक सेवा संचानालयाचे आयुक्त, ओमप्रकाश बकोरीया, साईचे संचालक डॉ. सुधांशू शेखर, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उद्योजक सुर्यकांत काकडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मुलांच्या विभागात ८ गटात २४ संघ तर मुलींच्या विभागात ४ गटात १७ संघ सहभागी झाले आहेत. मुलांच्या गटात महाराष्ट्र, हरियाणा, केरळ, उत्तर प्रदेश, लक्षद्विप, बिहार यांच्यासह १८ संघ तर मुलींच्या गटात गुजरात, महाराष्ट्र, आसाम, मध्य प्रदेश, दिल्ली यांच्यासह १२ संघ सहभागी झाले आहेत अशी माहिती राजू दाभाडे यांनी दिली.

जमशेदपूर, झारखंड येथे गतवर्षी झालेल्या स्पर्धेत मुलांच्या गटातून महाराष्ट्राने तर मुलींच्या गटातून गुजरात संघाने विजेतेपद पटकावले होते. यावर्षी देखील राष्ट्रीय स्पर्धेत सर्वच संघ दिमाखदार कामगिरी बजावतील, असा विश्वास चेतन भांडवलकर यांनी व्यक्त केला.

मुलांचा गटातील संघांची विभागणी :

अ गट : महाराष्ट्र, हरियाणा, केरळ

ब गट : उत्तर प्रदेश, ओडिशा, लक्षद्वीप

क गट : राजस्थान, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर

ड गट : गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार

इ गट : झारखंड, तामीळनाडू, गोवा

फ गट : मेघालय, आसाम, RSSA

ग गट : दिल्ली, पाँडिचेरी, चंदीगड

ह गट : मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश

मुलींच्या गटातील संघाची विभागणी :

अ गट : गुजरात, आसाम, झारखंड, छत्तीसगड, पाँडिचेरी,

ब गट : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ

क गट : जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा

ड गट : राजस्थान, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल

Leave a Reply

%d bloggers like this: