भारतीय संताच्या नावावर अमेरिकेतील एक रस्ता
भारत देशासाठी ऐतिहासिक क्षण!
पुणे : पूज्य गुरुदेव दादा जे.पी वासवानी मार्गचे उद्घाटन १४ मे २०२२ रोजी मायकेल गोनेली, मेयर, सेकॉकस शहर, न्यू जर्सी आणि दीदी कृष्णा कुमारी, कार्यकारी प्रमुख, साधू वासवानी मिशन यांच्या हस्ते करण्यात आले. एका भक्ताने सांगितले की, “अमेरिकेतील एका रस्त्याला भारतीय संताचे नाव दिले जात आहे हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.’’
जॉय अँड पीस गार्डन चे उद्घाटन
१४ मे रोजी दीदी आणि सेकॉकसच्या महापौरांसह दादांना समर्पित जॉय अँड पीस गार्डन चे उद्घाटन सेकॉकस शहरामध्ये करण्यात आले. दादांच्या प्रेमाने आणि आशिर्वादाने या उद्यानातील चराचर दृश्य, गंध आणि साद गुंजन करतील. हे एक सेकॉकस मधील संवेदी उद्यान असेल. उद्घाटन समयी चराचर विश्वाकरीता प्रार्थना व हवन करण्यात आला. नवीन रोपट्यांसोबत त्यांच्या पान आणि फुलांच्या माध्यमातून आशीर्वाद घेण्यासाठी हवनातील भस्मकलश लावण्यात आले.