fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

एमक्युअरतर्फे रक्तक्षय, अशक्तपणा, स्तनपान आणि मासिक पाळीशी संबंधित समस्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एफओजीएसआयबरोबर सहकार्य

पुणे : स्त्रियांच्या रक्तक्षय, स्तनपान आणि मासिकपाळी यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी औषध उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपनी एमक्युअर फार्मास्युटिकल्सने एमवोकल हा उपक्रम लाँच केला आहे. हा उपक्रम फेडरेशन ऑफ ओबेस्टेस्ट्रिक्स अँड गायनॅकॉलिजिस्ट ऑफ इंडिया (एफओजीएसआय) यांच्या सहकार्याने लाँच करण्यात आला आहे. ऑग्युमेंटेड रिअलिटी (एआर) आणि वैयक्तिक डिजिटल असिस्टंट यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या उपक्रमाने भारतातील १ कोटी स्त्रियांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे. एमवोकल कॅम्पेन नऊ भारतीय भाषांमध्ये (हिंदी, इंग्रजी, ओरिया, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि बंगाली) उपलब्ध केले जाईल.

एमवोकल कॅम्पेनअंतर्गत विविध हॉस्पिटल्स व दवाखान्यांतील वेटिंग एरियामध्ये क्यूआर कोड दर्शवणारे स्मार्ट किऑस्क बसवले जातील. यामुळे डॉक्टरांना भेटण्यापूर्वीच्या दीर्घ प्रतीक्षा काळाचा वापर रुग्णांना माहिती मिळवण्यासाठी करता येईल. हा क्यूआर कोड स्कॅन करणाऱ्या स्त्रियांना ऑग्युमेंटेड रिअलिटी (एआर) व्हिडिओज पाहायला मिळतील. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि वैयक्तिक डिजिटल असिस्टंटचाही त्यात समावेश असेल. रुग्णांना त्यांचे मूलभूत आरोग्य व जीवनशैलीशी संबंधित डिजिटल संवादात भाग घेण्याची विचारणाही केली जाईल. एआर जर्नीदरम्यान वैयक्तिक आरोग्य असिस्टंटतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनामुळे रुग्णांना त्यांच्या समस्या डॉक्टरांना सांगण्यास मदत होईल तसेच डॉक्टरांनी योग्य माहिती असलेले रुग्ण मिळतील.

भारताच्या पाचव्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार (२०१९-२०२१) १५ ते १९ वर्ष वयोगटातील स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण तब्बल ५९.१ टक्के असून ४९ वर्ष वयापर्यंतच्या गर्भवती स्त्रियांमध्ये हेच प्रमाण ५२.२ टक्के आहे. डिजिटल पातळीवर उपलब्ध असलेली माहिती आणि माहितीपर व्हिडिओज यांच्या मदतीने एमवोकल कॅम्पेन रक्तक्षयाबद्दल जागरूकता निर्माण करेल आणि स्त्रियांना त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहन देईल. स्तनपानांच्या फायद्यांविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जात असली, तरी एमवोकल कॅम्पेन स्त्रियांच्या आरोग्यासाठी त्याचे महत्त्व आणि लाभ समजून घेण्यास त्यांना मदत करेल. एमवोकलतर्फे जागरूकता निर्माण केल्या जात असलेल्या विषयांमध्ये मासिक पाळीचे आरोग्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजही भारतात मासिक पाळी हा विषय निषिद्ध मानला जातो आणि त्याविषयी असलेले विविध गैरसमज बदलणं गरजेचं आहे.

एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या भारतातील व्यवसायाचे अध्यक्ष प्रतीन वेते म्हणाले, ‘स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर बोलणे आजही निषिद्ध मानले जाते. यामुळे जागरूकतेचा अभाव तयार होतो आणि पर्यायाने बहुतांश स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. एमवोकलसारखा अत्यावश्यक उपक्रम लाँच करत स्त्रियांना आपल्या आरोग्याच्या समस्या हाताळण्यासाठी सहजपणे व वैद्यकीयदृष्ट्या तपासण्यात आलेली माहिती उपलब्ध करून देताना समाधान वाटत आहे. या उपक्रमाची सर्वात चांगली बाजू म्हणजे, ही माहिती स्त्रियांच्या वैयक्तिक गरजेशी संबंधित असते आणि त्यांना डॉक्टरांशी महत्त्वाच्या मुदद्यावर चर्चा करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. ’

एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक नमिता थापर स्त्रियांचे आरोग्य व त्याच्याशी संबंधित शिक्षण क्षेत्रात हिरीरीने काम करत असून त्यांनी एमक्युअरच्या यासंदर्भातील प्रयत्नांना दिशा दिली आहे. स्त्रियांच्या आरोग्यवर आधारित त्यांनी युट्यूबवर सुरू केलेल्या ‘अनकंडिशन युअरसेल्फ विथ नमिता’ या अशाप्रकारच्या पहिल्याच टॉक शो ला इंटरनेटवर चांगला प्रतिसाद मिळाला. या शोमध्ये त्या रुग्ण, डॉक्टर्स आणि तज्ज्ञांशी स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल संवाद साधतात.

स्त्रियांच्या आरोग्याविषयीचा संवाद सुरू ठेवत एमक्युअरने तयार केलेल्या इंडियन वुमन्स हेल्थ रिपोर्ट २०२१ नुसार ८४ टक्के नोकरदार स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान रूढी- परंपरांचा सामना करावा लागला असून त्यांना पवित्र ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ६७ टक्के स्त्रियांनी आजही भारतीय समाजात त्यांच्या आरोग्याविषयी बोलणे निषिद्ध असल्याचे सांगितले.

एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या वितरण आणि पोर्टफोलिओ धोरण विभागाचे वरिष्ठ संचालक सौरभ गंभीर म्हणाले, ‘स्त्रियांना त्यांच्या आरोग्याच्या अडचणींबद्दल बोलताना अवघडल्यासारखे वाटत असल्यामुळे आम्ही त्यांना सक्षम करण्यासाठी एमवोकल चळवळ सुरू केली. याद्वारे त्यांना आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आवश्यक माहिती व प्रोत्साहन दिले जाणार आहे. विकसनशील अर्थव्यवस्था या नात्याने आपण स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांना प्राधान्य देणे आणि त्याविषयीचा संवाद मुख्य प्रवाहात घडवून आणणे आवश्यक आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading