Vi – वीने पुण्यामध्ये केल्या जात असलेल्या ५जी चाचण्यांमध्ये नोंदवला सर्वाधिक ५.९२ जीबीपीएस डाउनलोड स्पीड
मुंबई : वोडाफोन आयडिया (वी) आणि एरिक्सनने (नॅसडॅक: ERIC) सध्या केल्या जात असलेल्या ५जी चाचण्यांमध्ये सर्वाधिक ५.९२ जीबीपीएस डाउनलोड स्पीड साध्य करून तंत्रज्ञानात एक खूप महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. वीने हा नवा स्पीड रेकॉर्ड महाराष्ट्रातील पुण्यामध्ये सुरु असलेल्या ५जी चाचण्यांदरम्यान एका सिंगल टेस्ट डिव्हाईसवर करून दाखवला आहे. या चाचण्या मिड-बँड आणि हाय-बँड (एमएमवेव्ह) ५जी ट्रायल स्पेक्ट्रम यांना एकत्र करून, स्टॅन्डअलोन आर्किटेक्चरसाठी एरिक्सन मॅसिव्ह एमआयएमओ रेडिओ, एरिक्सन क्लाऊड नेटिव्ह ड्युएल मोड ५जी कोअर आणि एनआर-डीसी (न्यू रेडिओ-ड्युएल कनेक्टिव्हिटी) सॉफ्टवेयर वापरून करण्यात येत आहेत.
५जी स्टॅन्डअलोन एनआर-डीसी सॉफ्टवेयरसह वी लॅटेन्सी-सेन्सिटिव्ह आणि उच्च कामगिरी बजावणारी एआर/व्हीआर आणि ८के व्हिडिओ स्ट्रीमिंग यासारखी ऍप्लिकेशन्स देऊ शकते आणि कमर्शियल नेटवर्कवर ५जी तैनात करण्यात आल्यावर ग्राहक आणि व्यवसाउद्योगांसाठी नवनवीन युज केसेस उपलब्ध करवून देऊ शकते.
याआधी पुण्यामधील ५जी चाचण्या आणि युज केसेसच्या शोकेसमध्ये वीने ४जीबीपीएसपेक्षा जास्त स्पीड प्रदर्शित केला होता. ५.९२ जीबीपीएसचा नवा स्पीड रेकॉर्ड सरकारने चाचण्यांसाठी दिलेल्या ५जी स्पेक्ट्रमचा वापर करून मिळवण्यात आला आहे.
या यशाबद्दल वीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. जगबीर सिंग म्हणाले,”५जीच्या कमी लॅटेन्सी, विश्वसनीयता आणि उच्च वेगांवर आधारित नवीन ५जी आधारित ऍप्लिकेशन्ससाठी वी आपल्या नेटवर्कच्या सातत्याने चाचण्या घेत आहे आणि ते सुसज्ज करत असल्याचे या चाचण्यांमधून दिसून येते. वेगळ्या जगात घेऊन जाईल असा मीडिया आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग अनुभव मिळवण्यासाठी उत्सुक ग्राहकांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेता, आम्ही प्रदर्शित केलेले ५जी स्पीड आम्हाला मोबाईल ब्रॉडबँड स्पीड्स आणि ग्राहकांच्या नेटवर्कच्या अधिक जास्त क्षमतांविषयीच्या मागण्यांसाठी सुसज्ज राहण्यात मदत करेल, कारण आम्ही भारतामध्ये ‘अधिक चांगल्या भविष्यासाठी ५जी’ घेऊन येण्यासाठी तयार आहोत.”
आपल्या युजर्ससाठी,अधिक चांगल्या भविष्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि भागीदारींचा उपयोग करून घेण्यावर वीचा भर असल्यामुळे ही कंपनी पुणे,गांधीनगर येथे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ५जी युज केसेस करून दाखवू शकत आहे,ज्याचा उपयोग करून उद्योगव्यवसाय व नागरिक अधिक स्मार्ट होऊ शकतात.
एरिक्सनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आणि कस्टमर युनिट वीचे प्रमुख श्री. अमरजीत सिंग यांनी सांगितले, “एरिक्सनचे ५जी स्टॅन्डअलोन एनआर-डीसी सॉफ्टवेयर आणि क्लाऊड-नेटिव्ह ड्युएल-मोड ५जी कोर यांचा वापर करून ५.९२ जीबीपीएस डाउनलोड स्पीड हा तंत्रज्ञान टप्पा पार करणे म्हणजे एमएमवेव्हसोबत ५जी स्टॅन्डअलोन साध्य करण्याच्या भारताच्या क्रांतीमध्ये मोठा टप्पा पार केल्यासारखे आहे. जागतिक पातळीवर १२१ लाईव्ह नेटवर्क्समध्ये आम्ही ५जी तैनात केले असल्यामुळे आम्हाला पक्की खात्री आहे की आम्ही वीसारख्या ग्राहकांना त्यांचे नेटवर्क ५जी वर नेण्यात मदत करू शकू.”
एरिक्सन मोबिलिटी रिपोर्टच्या नोव्हेंबर २०२१ आवृत्तीनुसार २०२७ शाळांपर्यंत भारतात सर्व मोबाईल सब्स्क्रिप्शन्समध्ये ५जी ची हिस्सेदारी ३९ टक्के असेल अशी अपॆक्षा वर्तवण्यात आली आहे. २०२७ पर्यंत संपूर्ण जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मोबाईल ऍक्सेस तंत्रज्ञान बनण्याच्या मार्गावर ५जी चा प्रवास सुरु आहे. तोपर्यंत ५जी हे जगभरातील सर्व मोबाईल सब्स्क्रिप्शन्सच्या जवळपास ५० टक्के असेल, यामध्ये जगातील ७५ टक्के लोकसंख्येचा समावेश असेल आणि ६२ टक्के स्मार्टफोन ट्रॅफिक ५जीवर चालत असेल.
