मानवतावादी साहित्याचे प्रणेते अण्णा भाऊ साठे – अर्जुन डांगळे
आण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे उद्घाटन संपन्न
राजश्री शाहू महाराज साहित्य संमेलन नगरी (पुणे) : मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वप्रथम भटके ,विमुक्त ,उपेक्षित ,दुर्लक्षित ,वंचित समाजाला साहित्यातून न्याय आण्णा भाऊ साठे दिला ,त्याबरोबरच स्त्रियांनाही साहित्यात पहिल्यांदा महत्त्वाचे स्थान दिले यामुळेच आण्णा भाऊ साठे हे मानवतावादी साहित्याचे प्रणेते आहेत असे मत साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या
उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केले .मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित साहित्य सम्राट आणा भाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाचे आयोजन पुण्यात केले होते त्याप्रसंगी अर्जुन डांगळे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,साहित्याने माणूस समृद्ध होतो .आज माणूस जात , धर्मा मध्ये विभागला जात आहे .अशा वेळी फुले ,शाहू ,आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची गरज निर्माण झाली आहे .ते विचार अशा साहित्य संमेलनातून सर्वापर्यंत पोहचू शकतात .आणि ते विचार आज पोहचवणे अतिशय गरजेचे असल्याचे डांगळे म्हणाले .
महानगरीय साहित्याचा पाया आण्णा भाऊ साठे यांनी घातला
विश्वास पाटील सुप्रसिद्ध कादंबरीकार
— महानगरातील आधुनिक प्रश्न ,झोपडपट्टीवासियांचे जीवन ,साहित्यात प्रखरपणे आण्णा भाऊ साठे यांनी त्याकाळी मांडले .महणूनच आण्णा भाऊ साठे
हे महानगरीय साहित्याचे जनक म्हंटले पाहिजे त्यांनीच महानगरीय साहित्याचा पाया घातला असे मत साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले .या संमेलनात विश्वास पाटील यांना साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की भारत देशात प्रेमचंद यांच्यानंतर स्त्रियांवर लीहणारे एकमेव लेखक आहेत .त्यांच्या एकूण सहित्यपैकी सर्वाधिक कादंबऱ्या आणि कथा स्त्रियांवर आधारित आहेत .ते मानवजातीचे पुजारी होते .
आज पर्यंत अनेक लेखक ,कलावंत यांना भारतरत्न देण्यात आला आहे . आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा .त्यामुळे मराठी भाषेचा आणि त्यांचा कार्याचा गौरव होईल असे पाटील म्हणाले
आण्णा भाऊ साठे यांचे विचार जैविक – विठ्ठल भंडारे संमेलनाध्यक्ष
आण्णा भाऊ साठे यांचे विचार हे मानवतावादी होते त्यांनी समाजातील उपेक्षित ,वंचित घटकांना साहित्याचा नायक केले .ही पृथ्वी शेशाच्या मस्तकावर नसून ती दलीत श्रमिकांच्या तळहातावर आहे.असे आण्णा भाऊ सांगतात त्यामुळेच आण्णा भाऊ यांचे विचार हे जैविक होते असे मत साहित्य
सम्राट आण्णा भाऊ साठे संमेलनाचे संमेलनाध्यक्ष विठ्ठल भंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
संमेलनाचे उद्घाटन शोषणाच्या संस्था असणाऱ्या जात वर्ग
स्त्रिदास्याची बेडी तोडून एका अनोख्या क्रांतिकारी पद्धतीने उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे व सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांचा हस्ते करण्यात आले .
संमेलनाचे स्वागताध्यक्ष अविनाशजी बागवे यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले .प्रास्ताविक सचिन बागडे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल हातागळे यांनी केले .
यावेळी माजी मंत्री रमेश बागवे यांनी
शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत झालेल्या वक्तव्याचा निषेध करून ठराव मांडण्यात आला .
या संमेलनास विश्वास पाटील सुप्रसिद्ध कादंबरीकार ,स्वागताध्यक्ष अविनाश बागवे ,हनुमंत साठे अध्यक्ष संयोजन समिती,संमेलनाचे आयोजक सचिन बगाडे, अनिल हातागळे निमंत्रक संयोजन समिती ,
प्रा.डॉ. राज ताडेराव महासचिव, अण्णा भाऊ साहित्य परिषद *सचिन बगाडे संस्थापक मुक्ता साळवे साहित्य परिषद ,सोपान खुडे अध्यक्ष मुक्ता साळवे साहित्य परिषद ,विजयबापू डाकले अध्यक्ष लहुजी साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासन
डॉ. कालिदास शिंदे,
पुंडलिक धोटवे
. किरण लोंढे, मा.कॉ. सुबोध मोरे, मा.डॉ. विपुल भागवत, मा.सौ. अरूणा दिवेगावकर, मा.प्रा.डॉ. मोहन लोंढे,
