छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळापूर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन
पुणे:स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळापूर येथे संभाजी ब्रिगेड व शंभुराज्याभिषेक ट्रष्टच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिरसाट मराठी चित्रपटाचं प्रमोशन करण्यात आले,शंभुराज्याभिषेक ट्रष्ट व संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण भाषेत असलेला तिरसाट चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देऊन, २० मे ला प्रदर्शित होत असलेला तिरसाट चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी पहावा असे आवाहन करण्यात आले, यावेळी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शंभुराज्याभिषेक ट्रष्ट संस्थापक शेखर पाटील, तुळापूर च्या सरपंच गुंफाताई इंगळे, माजी उपसरपंच संतोष शिवले, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव निलेश ढगे, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, मावळ तालुकाध्यक्ष उमेश मांढरे, वाहतुक आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, मावळ लोकसभा कार्यध्यक्ष दिनकर केदारी, माथाडी कामगार नेते आबासाहेब मांढरे, सोशल मिडिया उपाध्यक्ष अशोक फाजगे, कामगार आघाडी उपाध्यक्ष चांदभाई तांबोळी, तिरसाट चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, व शंभु प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
