Wednesday, June 3, 2026
Latest NewsSports

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रामाराव डोसा यांना दुहेरी मुकुट 

 

  • 55वर्षांवरील पुरुष एकेरीत अजय कामत यांना विजेतेपद

पुणे, 7 मे 2022: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 70वर्षांवरील पुरुष गटात रामराव डोसा यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, 55वर्षांवरील पुरुष एकेरीत पुण्याच्या अजय कामत यांनी विजेतेपद पटकावले.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 70वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित रामाराव डोसाने अव्वल मानांकित ताहीर अलीचा टायब्रेकमध्ये 4-6, 7-6(5), 10-8 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीत याच गटात अंतिम लढतीत ताहीर अली व रामराव डोसा यांनी रत्नाकरराव आनी व धवल पटेल यांचा 6-3, 6-7(8), 10-7 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

55वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अजय कामत याने अव्वल मानांकित आलोक भटनागरचा 7-5, 6-0असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत 55वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत उल्हास फुलझेली व पॉल वरघसे यांनी कुबेर धोंडिबा चावरे व कुलदीप सिंग या जोडीचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि बाबा रॉड्रिक्स यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: 40 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी: 

मंदार वाकणकर(भारत)[4]वि.वि.नीरज आनंद(भारत)[7] 6-2, 6-2;

आदित्य खन्ना(भारत) [1]वि.वि.स्वरणदिप सिंग दोडी(भारत)[3]6-3, 6-3;

55वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:

अजय कामत(भारत)वि.वि.आलोक भटनागर(भारत)[1] 7-5, 6-0;

70वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:

रामाराव डोसा(भारत)[3]वि.वि.ताहीर अली(भारत)[1]4-6, 7-6(5), 10-8;

महिला 45 वर्षांवरील: राउंड रॉबिन:

मायुका सकाय(जपान)[1]वि.वि.नंदिता नूलकर(भारत)6-0, 6-0;

ज्योत्स्ना पटेल(भारत)[2]पुढे चाल वि.प्रेरणा आपटे(भारत)

दुहेरी: 40 वर्षांवरील पुरुष: उपांत्य-फेरी:

स्वरणदिप सिंग दोडी(भारत)/आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.रमझान शुक्ला(भारत)/बद्री विशाल(भारत)[3] 6-3, 6-2;

कमलेश शुक्ला(भारत)/मंदार वाकणकर(भारत)[2]वि.वि.जॉय बॅनर्जी(भारत)/रवी कोठारी(भारत)4-6, 6-1, 10-4;

55वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:

उल्हास फुलझेली(भारत)/पॉल वरघसे(भारत) वि.वि.कुबेर धोंडिबा चावरे(भारत)/कुलदीप सिंग(भारत)6-1, 6-0;

70वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:

ताहीर अली(भारत)/रामराव डोसा(भारत)[1]वि.वि.रत्नाकरराव आनी(भारत)/धवल पटेल(भारत)6-3, 6-7(8), 10-7.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading