पुण्यातील महिला उद्योजिका सामाजिक कार्यात अग्रेसर – अमिताभ गुप्ता
जिद्द आणि चिकाटी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याचं सूत्र – अमिताभ गुप्ता
पुणे : पुणे जिल्ह्यातील दुर्गम गावे दत्तक घेणे ,शहरातील वंचित ,दुर्लक्षित घटकांना कायम मदत आणि त्यांच्यासाठी सामाजिक कार्य करणारी फिक्कीच्या महिला आघाडीच्या उद्योजिका समाजाला आदर्श ठरणारे कार्य करीत आहेत . पुणे पोलीस आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहे. त्याद्वारे महिलांची सुरक्षितता आणि महिला उद्योजिकांना प्रोत्साहन मिळू शकेल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
पुण्यातील फिक्की(FICCI) च्या FLO महीला विंग आयोजित महिला उद्योजिका ना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिक्की महिला विंगच्या वतीने आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी मुक्त संवाद आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . पुढे ते म्हणाले की , कोणताही क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटी हे खरं सूत्र आहे . महिला उद्योग विश्वात स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करतात ही समाजासाठी अतिशय अभिमानाची बाबा आहे . आपल्या कार्याला आणि फिक्की महिला आघाडी करीत असलेल्या विविध उपक्रमाला प्रोत्साहन देणे आमचे कर्तव्य असल्याचे गुप्ता यावेळी म्हणाले. यावेळी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासमोर महिलांनी पुणे शहरातील विविध विषय ,महिलांचे प्रश्न मांडले त्यावेळी अतिशय सकारात्मक रितीने त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी आपल्याला व आपल्या महिला आघाडी साठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले .तसेच फिक्की महिला आघाडी सोबत भविष्यात शहरात विविध समाज उपयोगी उपक्रम करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फिक्की महिला विंग मधील महिला उद्योजिकांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी फिक्की महिला आघाडी अध्यक्ष नीलम सेवलेकर यांनी दिली. महिला उद्योजिकांना दिशा देण्यासाठी आगामी काळात विविध उद्योग मार्गदर्शन शिबिर परिषदा तसेच कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
फिक्की महिला विंगच्या अध्यक्षा नीलम शेवलेकर, वरिष्ठ उपअध्यक्षा रेखा मगर, उपाध्यक्ष पिंकी राजपाल ,खजिनदार सोनिया राव, सहखजिनदार पुनम खोच्चर, सचिव अनिता अग्रवाल, सहसचिव सुजाता सबनीस, उषा पूनावाला यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
