Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

वसंत मोरे यांच्या महाआरतीला राज ठाकरे व कार्यकर्ते पण अनुपस्थित

पुणे : मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी आज कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते.
या महाआरतीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही गैरहजेरी होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मनसेचे शहरप्रमुख व मोरे यांचे मित्र साईनाथ बाबर यांची अनुपस्थितीही नजरेत भरली
राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते वसंत मोरे यांच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, अशी चर्चा दिसभर रंगली होती. मात्र, राज ठाकरे यांनी महाआरतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, त्याच बरोबर शहरातील इतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही गैरहजर होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading