Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

डाॅ.नंदकिशोर कपोते यांची शासनाच्या वेस्ट झोन कल्चरल सेंटर कमिटीवर निवड

पुणे: महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पश्चिम क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार च्या महत्वपूर्ण कमिटीवर प्रसिध्द नत॔क डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
या समिती ची पहिली मिटींग नुकतीच जयपूर येथील जवाहर कला केंद्र येथे पार पडली. या बैठकीस राजस्थान चे सांस्कृतिक मंत्री बी.डी.कल्ला , सांस्कृतिक संचालीका किरन सोनी गुप्ता, जवाहर कला केंद्राच्या अधिकारी ADG(Adm)  अनुराधा गोगिया, गोव्याचे आर्ट अ‍ॅन्ड कल्चर, शासन अधिकारी अशोक परब व महाराष्ट्र शासनाच्या वतीने कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते उपस्थित होते.
या समिती च्या अंतर्गत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा इ. राज्य येतात. कला संस्कृतींच्या देवाण घेवाण कार्यक्रमात भक्ती महोत्सव, शास्त्रीय नृत्य महोत्सव, आजादी का अमृत महोत्सव यात योगादिन कार्यक्रम, लोक संगीत, लोक नाट्य कार्य शाळा,शिल्प ग्राम उत्सव, आदिवासी नृत्य महोत्सव अशाप्रकारचे अनेक कार्यक्रम या वर्षभरात होणार आहेत. या वेळी डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी महाराष्ट्रात शास्त्रीय नृत्य महोत्सव, गुरु- शिष्य परंपरा , आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात पाच हजार कलाकारांचा एकत्रित नृत्य कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सुचना मांडली. त्या मुळे महाराष्ट्रातील जेष्ठ कलाकार व युवा कलाकार यांना संधी मिळणार आहे.
डाॅ.पं.नंदकिशोर कपोते हे आंतरराष्ट्रीय कीर्ती चे नर्तक असुन त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार, पदमविभूषण पं.बिरजूमहाराज नृत्य आचार्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. डॉ.कपोते कथक नृत्यात डॉक्टरेट असुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, श्री श्री युनिव्हर्सिटी,कटक व श्री छत्रपती शिवाजीमहाराज युनिव्हर्सिटी,पनवेल येथे पी.एच. डी. विद्यार्थ्यांसाठी गाईड म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading