हरीगंगा सोसायटी येथे ईद-ए-मिलाद कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : हरिगंगा सोसायटी येथे रमजान ईद निमित्त हरिगंगा उत्सव समिती व सोसायटीतील मुस्लिम बांधव यांच्या संयुक्त विद्यमानाने “ईद- ए -मिलाद” कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. हरी गंगाा सोसायटीमध्ये एकूण ९०५ सदनिका आहेत. सर्व जाती व धर्माचे सण उत्सव अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.
या कार्यक्रमासाठी येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सोसायटीतील उत्सव समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मुस्लिम बांधवांच्याा वतीने उपस्थित सर्वांसाठी शीरखुर्मा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सोसायटीतील सर्व नागरिकांनी एकत्र येत रमजान ईद सण या वेळी साजरा केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश गोळे, निर्भय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल गायकवाड यांच्यासह सोसायटीचे अध्यक्ष शेखर बोनगिर, संचालक संजय पोळ, राहुल ऐंचवार, विजय फाळके, प्रतिभा शेट्टी, सलीम शेख, मोहम्मद शेख यांच्यासह सोसायटी मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
