Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

विवाह सोहळ्यातून जुळले दिव्यांग आणि दृष्टीहिन मुला-मुलींचे रेशीमबंध

पुणे : देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठया हौसेने मामा लोकांनी सजविलेले रुखवत… सनई-चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी व-हाडी मंडळी…. अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन व दिव्यांग बांधव अशा ह्रद्य वातावरणात दृष्टीहिन व दिव्यांग वधू-वरांचे रेशीमबंध जुळले. डोळ्याने दिसत नसले आणि आधाराशिवाय जरी चालता येत नसले, तरी आपले नातवाईक किंवा आपेष्ट नसूनही विवाह सोहळ्याकरीता आलेल्या मान्यवरांचे भरभरुन प्रेम पाहून आणि आपुलकीने दिलेल्या शुभेच्छांनी वधू-वरांच्या डोळ्याच्या कडा आनंदाश्रूंनी पाणावल्या.

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बळ असलेल्या दृष्टीहिन व दिव्यांग मुला – मुलींच्या अनोख्या विवाहसोहळयाचे. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आयएएस अधिकारी विशाल सोलंकी, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, विद्याधर अनास्कर, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, अ‍ॅड. भगवान साळुंके, सुनिल रुकारी, सीए जनार्दन रणदिवे, रोहिणी चेन्नुर, सुनेत्रा रार्चला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. शुभांगी व चारुदत्त आफळे, दीपा व सचिन ससाणे यांनी कन्यादान केले. यांनी उपक्रमाचे ८ वे वर्ष होते. खेड येथे राहणारी प्रिती गाडे आणि अहमदनगरचा दत्तात्रय जाधव या दृष्टीहिन जोडप्याचा विवाह संपन्न झाला. दुसरे दांम्पत्य कर्नाटकातील राधा बडीगेर आणि रामलिंग चलवदी या दिव्यांग जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला.

शिरीष मोहिते म्हणाले, सेवा मित्र मंडळ, इतर गणेशोत्सव मंडळांनी व पुणेकरांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाहसोहळ्याची तयारी सुरु केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा मोठया उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष जगदीश शेटे, अमर लांडे, विक्रांत मोहिते, वैभव वाघ, उमेश कांबळे, अजय पंडित, कुणाल जाधव, साहिल आंबेडकर, सदाशिव कुंदेन, प्रशांत मते आदींनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading