Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात दादा जेपी वासवानी चौकाचे उद्घाटन

पुणे : नुकतेच पुण्यात थोर संत गुरुदेव दादा जे.पी. वासवानी यांचे नाव असलेल्या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या नाव असलेला हा पुण्यातील पहिलाच चौक आहे. हा चौक सेंट मीरा कॉलेज जवळ, ताज ब्लू डायमंड समोर, मंगलदास रोडच्या क्रॉसिंगवर आहे. योगायोगाने, दादा जे.पी. वासवानी चौक हा साधू वासवानी पुलाच्या खाली असलेल्या पहिल्या क्रॉसिंगवर आहे.

या चौकाचे उद्घाटन साधू वासवानी मिशनच्या कार्यकारी प्रमुख दीदी कृष्णा कुमारी आणि पुणे महानगरपालिकाच्या (पीएमसी) नगरसेविका सौ.मंगला मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात हवन (पवित्र अग्नि), कीर्तन आणि प्रार्थना यांचा समावेश होता. पूज्य दादा जे.पी. वासवानी यांच्या प्रतिमेसह संगमरवरी फलकाचे अनावरण करण्यात आले – हा फलक कायमस्वरूपी चौकात राहणार आहे. यावर लिहिले आहे “प्रेमापेक्षा मोठी शक्ती नाही.”

या उद्घाटनप्रसंगी दीदी कृष्णा कुमारी यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्‍या म्हण्याल्या, “शंकराचार्यय जेव्हा पुण्यात भेटी साठी आले होते त्‍यांनी संगितले होते हे शहर गुरुदेव साधु वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांच्या सारख्या महान व्यक्तींच्या संरक्षणाखाली आहे. हे अगदी खरे आहे. त्यांची उपस्थिती या शहराचे रक्षण करत आहे.” त्‍या पुढे म्हणाल्‍या, “दादा आम्हाला या शाश्वत रूपी जगात वावरण्यासाठी त्याच्या प्रेमळ आणि करुणारुपी साद घालून आम्हाला जागवायला आले होते; त्‍यांना स्वतःसाठी कधीच काही नको होते. ते नेहमी म्हणत:

‘‘जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर इतरांना आनंदित करा.’’ जर प्रत्येकाने हा एक संदेश स्वतःसोबत घेतला तर जग एक नवीन ठिकाण होईल. आपण मिळून पुण्याला, आपल्या भारताला शांतता आणि आनंद देणारे ठिकाण बनवू या.

श्रीमती मंत्री उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाल्या, “मिशनने मला आनंदाचे कारण दिले आहे. मी कृतज्ञ आहे कारण देवाने मला एक साधन बनवले.आज या सोहळ्यात समाज्‍यातील विविध क्षेत्रातील लोक सामील झाले आहेत. मला आशा आहे की ते सराव करतील मिशनच्या शिकवणी बददल सत्य, प्रेम आणि करुणा.”

या समारंभास उपायुक्त श्री.संजय गावडे, प्रभाग अधिकारी ज्ञानेश्वर तुपे, डॉ. गलांडे, वैद्यकीय अधिकारी, प्रकाश रामेश्वर मंत्री, माजी उपमहापौर, पीएमसी, पुणे, धैर्यशील वांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading