Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

पक्षातील असंतुष्ट आत्मे मी पक्ष सोडल्याच्या अफवा पसरवताय -वसंत मोरे

पुणे: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला भोंगे काढण्याचे आवाहन केले होते. मात्र ३ मे रोजी यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. यामध्ये मनसेचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे हे मात्र या सर्व गोष्टींपासून दूर असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते.

वसंत मोरे मनसेच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा मी आजारी आहे, मी पक्ष सोडणार, अशा चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहेत. पण असं काहीच नाही. पक्षातील काही असंतुष्ट आत्मे माझ्या पक्ष सोडण्याबाबत सतत अफवा पसरवत असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
आज मनसे ची महा आरती वसंत मोरे यांच्या प्रभागात पार पडली . त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मी पक्ष कार्यालयात गेलो नाही. मी नाराजी राज साहेबांसमोर मांडली आहे. शहरात मी सातत्याने १५ वर्षे फक्त मनसेचे काम केले. पक्षाला उभारी मिळवून दिली. परंतु कुठलंही विचार न करता माझे शहराध्यक्ष पद काढून घेतले. त्यानंतर साईनाथ बाबर शहराध्यक्ष बनवण्यात आले. तिकडे फटाके वाजवले गेले. त्यांनी उत्सव साजरा केला. पण माझ्याबद्दल कुठलंही विचार केला नाही. ही सगळी नाराजी मी राज साहेबांसमोर मांडणार आहे. वसंत मोरेंचं जे पोटात असत ते ओठावर असत. शहर म्हणून काय भूमिका करावी हे ते ठरवतील, मी माझ्य प्रभागात या सर्व गोष्टी केल्या आहेत. म्हणून पक्षासाठी काम करत राहिलो पण शहर कार्यालयात फिरकलो नसल्याचे वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले.
माझ्य प्रभागात एकूण ६ मशीद आहेत. त्यांच्या पदधिकाऱ्यांशी मी स्वात जाऊन बोललो आहे. त्यांनी मला सहकार्याची भूमिका दाखवली. आणि राज साहेबांच्या भूमिकेनंतर कायद्यप्रमाणे नियम पाळले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading