भारताच्या समकालीन मातांच्या कथांसोबत वेस्‍पा साजरा करीत आहे मातृदिन

पुणे :यावर्षीच्या मातृदिनाच्या निमित्ताने इटालियन पियाजिओ ग्रुपच्या १०० टक्के मालकीची कंपनी असलेल्या पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. आणि वेस्‍पा व अॅप्रिलिया या दोन खास गाड्यांच्या उत्पादक कंपनीने आपल्या आयुष्याच्या विविध क्षेत्रांमध्ये मातेची भूमिका निभावणाऱ्या भारतातील विविध भागांमधील समकालीन मातांचा उत्सव साजरा केला.

मातृत्वाची प्रेरणा आई त्याच्या बाळासोबत दिसण्याच्या नियमित संकल्पनेपलीकडील आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून वेस्‍पाने मातृत्वाची कल्पना लिंग, वय किंवा स्वरूपापलीकडे जाणारी आहे या गोष्टीवर भर दिला आहे. त्यांचा गौरव करून त्यांच्या कथा समोर आणण्यासाठी वेस्‍पाने दोन अशा खास मातांसोबत काम केले आहे, ज्यांनी आपल्या स्वतःच्या मातृत्वाच्या व्याख्येद्वारे अनेकांना प्रेरणा दिली आहे.

या जागतिक साथीमुळे अनेकांच्या आयुष्यावर अनपेक्षित आणि अभूतपूर्व प्रभाव पडला. जगभरातील लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर त्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचे दिसून आले. अशा काही दुर्दैवी घटनांमध्येच मुंबईतील महिमा बलोटिया यांची कॉर्पोरेट नोकरी गेली. यामुळे त्यांना आपल्या घरी प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि त्याचसोबत त्यांना हे कळले की त्यांच्या वडिलांना ऑनलाइन ऑर्डर देणे किंवा व्हिडिओ कॉल सुरू करण्यासारख्या छोट्या गोष्टींसाठीही त्यांची गरज भासत होती. महिमा यांना हे जाणवले की त्यांच्या वडिलांप्रमाणेच अनेक वयोवृद्ध व्यक्ती असतील, ज्यांना आयुष्य अत्यंत सुलभपणे पुढे जाण्यासाठी अत्यंत लहान लहान कामांमध्ये मदतीची गरज भासू शकते. या जाणीवेमुळे आमच्या महिमा नावाच्या खास मातेने सोशल पाठशाला नावाची नवीन युगातील शाळा आणि उपक्रम सुरू केला. या मागील संकल्पना अशी होती की, ५० वर्षे वयावरील लोकांना व्हिडिओ कॉल्स सुरू करणे, व्हॉट्सएप लोकेशन्स पाठवणे, कॅब बुक करणे, संपर्कात राहण्यासाठी फेसबुक अकाऊंट्स तयार करणे, ऑनलाइन खरेदी करणे आणि इतर अनेक गोष्टी करून तंत्रज्ञानाभोवती काम करण्यास शिकवण्याची होती. सोशल पाठशालाने आतापर्यंत संरक्षण, वैद्यकीय, वित्त इत्यादी विविध क्षेत्रांमधून येणाऱ्या २००० पेक्षा अधिक लोकांना मदत केली आहे. वेस्‍पासोबतच्या या भागीदारीतून महिमाची शौर्य, सहभावना आणि करूणेची गोष्ट जगापुढे येत आहे. तिने आपले तंत्रज्ञानाचे ज्ञान सर्वाधिक गरज असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवून अनेक लोकांचे आयुष्य अडथळामुक्त केले आहे.

अशीच आणखी एक प्रेरणादायी गोष्ट आहे आमची रांचीमधील आर्ची सेन हिची. विशीतल्या या तरूण मुलीला, आर्चीला हे जाणवले की जागतिक साथीदरम्यान प्रतिबंध, कर्फ्यू आणि लोकांच्या हालचालींवर मर्यादा आल्यामुळे रस्त्यावरील कुत्र्यांना अत्यंत मुलभूत पोषणही मिळत नव्हते. तिने आपल्या आसपासच्या परिसरातील कुत्र्यांना जंतनाशक देणे, खाणे देणे आणि लसीकरणाची जबाबदारी घेतली, जेणेकरून ते सुदृढ आणि कोणत्याही आजारापासून मुक्त राहतील. त्याचबरोबर या आपल्या प्रेरणादायी मातेने निधी उभारण्यासाठी आणि दत्तक घेण्यासाठी मोहिमा आयोजित करून गरजू कुत्र्यांना मदत करण्यासाठी काम केले. वेस्‍पाने तिला दिलेल्या एका दिवसाच्या कालावधीत ही गोष्ट सांगत असताना आर्चीने एका कुत्र्याच्या पिल्लाला जवळच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेल्याचे सांगितले. आर्चीने दाखवलेले हे नि:स्वार्थी प्रेम आता आपण आईचे प्रेम कसे असते त्याबद्दलच्या पुरातन कल्पना सोडून त्यापलीकडे गेलो आहोत हे दाखवते.

Leave a Reply

%d bloggers like this: