हिंदू वीरशैव लिंगायत मंचातर्फे जगतज्योति महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी दिलेली घोष मानवंदना… महिलांच्या हस्ते प्रतिमेचे केलेले पूजन व औक्षण आणि धान्य रंगावलीतून साकारलेले महात्मा बसवेश्वर यांचे रेखाचित्र अशा उत्साही वातावरणात बाजीराव रस्त्यावरील जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर त्यांची जयंती साजरी झाली.

हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या पुणे महानगर शाखेतर्फे बाजीराव रस्त्यावरील जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाहक डॉ. प्रविण दबडगाव, महानगर कार्यवाहक महेश करपे, हेमंतराव हरहरे, शरद गंजीवाले, अतुल सरडे यांसह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष अनिल गाढवे, सुनील रुकारी, डॉ.राजेंद्र हिरेमठ, विजयराव पानगावे, वीरशैव लिंगायत समाज पुणेचे अध्यक्ष विलास मारटकर, किशोर कडेकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराणा प्रताप उद्यान येथे बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष विभागातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे महिलांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी कलाकार अमोल काळे यांनी तांदूळ, मसूर, मूग, हरभरा, मीठ, गोडा मसाला इत्यादी साहित्य वापरून ४ बाय ३ आकारातील धान्य रंगावली २ तासात साकारली. हे धान्य वंचित विकास संस्थेला देण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: