राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर आज औरंगाबाद येथील सीटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली गेली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान याच सभेत राज ठाकरे यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अटी शर्तींचा भंग करणे,153 अ- दोन समूहात भांडण लावणे,116 : गुन्हा करण्यासाठी मदत,117 – गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण या कलमा अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासह सभेला परवानगी मागणारे राजीव जवळीकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: