Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

.. तर परिस्थिती हाताळण्यास पोलिस सक्षम – दिलीप वळसे-पाटील

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा पार पडणार आहे.शेकडो मनसैनिक या सभेसाठी औरंगाबादेत दाखलही झाले. आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेकडे सगळ्यांचीच नजर लागलीय. दरम्यान, सभेआधी परवानगी देण्यावरुन राजकारण रंगलं होतं. अखेर औरंगाबाद पोलिसांनी मनसेच्या या सभेला परवानगी दिली. राज ठाकरे त्यांच्या वक्तव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
राजकीय सभा आणि राजकीय कार्य़क्रम लोकशाहीत चालत राहणार. कायदा सुव्यवस्था शांतता ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. त्यासाठी पोलीस सज्ज आहेत. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी अपेक्षा आहे आणि घडलंच तर त्याला सामोरं जायलाही पोलीस सक्षम आहेत. हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील पत्रकाराना राज ठाकरेंच्या सभेला परवानगी का दिली याचे कारण सांगितले.

शेकडो मनसैनिक या सभेसाठी औरंगाबादेत दाखलही झाले. आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेकडे सगळ्यांचीच नजर लागलीय. दरम्यान, सभेआधी परवानगी देण्यावरुन राजकारण रंगलं होतं. अखेर औरंगाबाद पोलिसांनी मनसेच्या या सभेला परवानगी दिली. त्यानंतर आता पुण्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रकारांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर दिलीप वळसे पाटील . एकीकडे मनसेची तर दुसरीकडे भाजपचीही सभा पार पडणार आहे. राजकीय सभांच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरेंना सभेआधीच नोटीस देण्यात आली आहे का, असाही प्रश्न यावेळी वळसे पाटील यांना उपस्थित करण्यात आला. त्यावर वळसे-पाटील म्हणाले,आम्ही राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली. तेव्हा ती अटी आणि शर्थीसह दिलेली आहे. याचाच अर्थ सभेआधी राज ठाकरेंना आज कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांकडून राज ठाकरेंना सभेसाठी तीन महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading