‘महाराष्ट्र दिन’ निमित्त निराधार विधवा ताईंला उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन भेट


एचएआरसी संस्थेमार्फत निराधार मुलीचे स्वीकारले पालकत्व

परभणी : महाराष्ट्र दिन व कामगार दिन’ निमित्त होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे एका निराधार विधवा ताईला शिलाई मशीन देण्यात आली.

आज ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिन’ चे औचित्य साधून आयोजित कार्यक्रम ‘विष्णू नगर’ येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा शिवा आयथळ यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले.

सेलू तालुक्यातील वालुर येथील एका निराधार दुर्धर आजारग्रस्त महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर ती महिला अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगत आहेत. या महिलेने शिलाई मशीन चालविण्यासाठी प्रशिक्षण घेतले असून संस्थेतर्फे आपण तिचे सर्व कागदपत्रे व घरची बिकट आर्थिक परिस्थिती आदींचा विचार करून या गरजू महिलेला शिलाई मशीन दिली. या मशीनवर ती महिला तिच्या भागात काम करून तिला कुटुंबाचा उदरनिर्वाह साठी मदत होऊ शकते.
तसेच परभणीत भारतीय बाल विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या एका निराधार एकल पालक मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिला 10 वी लागणारी सर्व पुस्तके, शैक्षणिक साहित्य व गणवेश देण्यात आला.

चित्रकला कार्यशाळेस प्रतिसाद: या प्रसंगी 6 ते 13 वयोगटातील मुला मुलींसाठी चित्रकला व ललित कला कार्यशाळा आयोजित करण्यात आला होती. या कार्यशाळेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील कलाशिक्षक प्रा पांडुरंग पाटणकर यांनी विविध प्रयोगातून मुलांना कलेतुन मनोरंजन, गाणी, कागदी टोपी, कला कुसर, वारली पेंटिंग, ग्रिटिंग आदि चे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेस 24 मुलांची उपस्थिती होती. या मुलांनी या कार्यशाळेत उत्स्फुर्तपणे प्रतिसाद नोंदवला. शेवटी लहान व मोठा गटातील प्रत्येकी 2 मुलांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

या उपक्रमासाठी ‘100/- Rs प्रति माह डोनेशन’ या नावे तयार केलेल्या ग्रुपने मोलाचा सहयोग दिला.
या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, प्रा शिवा आयथळ, विशाल मुंदडा, संदीप भंडे, बद्रीविशाल सोनी, सत्यंजय हर्षे, प्रा पांडुरंग पाटणकर, प्रा पद्मा भालेराव, रवी मौर्य,  राठोड, वैभव राका, अनुराधा अमिलकंठवार यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

%d bloggers like this: