महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गार्डन किटचे वाटप
पुणे : लोहगावचे युवा नेते प्रितम प्रतापराव खांदवे आपल्या सामाजिक उपक्रमातून नेहमीच चर्चेत राहतात. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रितम खांदवे यांनी लोहगावमधील पोरवाल रोड वरील उच्चभ्रू सोसायटी भागामध्ये गार्डन किट वाटण्याचा कार्यक्रम राबवला.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सोबत मातीशी असणारी आपली नाळ सदैव जुडलेली रहावी यासाठी आम्ही आपल्या आहारात असणाऱ्या भाजीपाल्यांच्या बियांचे आणि सेंद्रिय खतांचे वाटप करत आहे. जेणे करून आपल्या घरातील लहान मुलांना भाजीपाला शेतात कसा उगवला जातो याची माहिती मिळेल तसेच आपल्या आहारात सेंद्रिय भाजीपाला जाईल असे मत प्रितम खांदवे यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रितम खांदवे यांच्या वतीने देण्यात आलेल्या गार्डन किटमध्ये गांडूळ खत, कोकोपीट माती, खत मिश्रण, ग्रोबॅन आणि माहिती पत्रक इत्यादी सामग्री पुरवण्यात आली. प्रितम खांदवे यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमाला संतोष नलावडे, मंगला ठोंबरे, पियुष शुक्ला, जतीन बगेकर, उमेश सिंग, श्रीकांत खांदवे, अमोल खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते.
