खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करावी यासाठी टोल नाका कृती समिती आक्रमक

पुणे : पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करावी आणि टोल नाका हटवावा.या मागणीसाठी खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीने पुण्यातील कात्रज चौकात आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी हटाव कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे नेतृत्व माऊली दारवटकर यांनी केले.

या आंदोलनाच्या वेळी प्रशासन आणि एनएचएआय विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माऊली दारवटकर म्हणाले, आंदोलनाची दखल घेतली गेली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाणारे असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली आहे. कृती समितीची एप्रिल महिनाअखेर एक बैठक झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र दिनी आंदोलन करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आज हे आंदोलन करण्यात आले. सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. हा टोल नाका नागरिकांची लूटमार करत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.पुणेकरांची बाजू कृती समितीने आंदोलनात वारंवार मांडली आहे . मात्र पुणेकरांचे लोकप्रतिनिधी प्रतिसाद देणार नसतील तर सामान्य जनतेसोबत ही लढाई लढावी लागेल. मात्र लोक प्रतिनिधींची टोलनाक्यांबाबतची अनास्था अनाकलनीय असल्याची टीका कृती समितीचे समन्वयक माऊली दारवटकर यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: