प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन

पुणे: मॉडर्न विकास मंडळ पुणे च्या वतीने रक्तदान शिबिराचे महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. शिबीर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत,साकेत सोसायटी सभागृह, शिवतीर्थनगर , पौड रस्ता, कोथरूड येथे झाले. या शिबीराचे यंदाचे ३१ वे वर्ष होते. बढेकर ग्रुप, स्मार्ट पुणे फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे पार पडले. डॉ. संदीप बुटाला, मनीषा बुटाला यांनी स्वागत केले. मॉडर्न विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संयोजन केले .

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या शिबीराचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष, जगदीश मुळीक , भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी नगरसेवक जयंत भावे, दिलीप उंबरकर, प्रा. सदाशिव सोहोनी , अतुल कामटे हे उपस्थित होते .

रक्तदान ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इतर अनेक राज्यात, दिल्लीत ही परंपरा नाही. रक्त देण्याने जीवनदान मिळते, याबाबत अजून जागरूकता घडवून आणली पाहिजे. समाजासाठी देण्याची भावना अशा शिबिरात असते. म्हणून मॉडर्न विकास मंडळाचा हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. प्रवीण बढेकर यांचा सत्कार करण्यात आला. संदीप गुजर यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

%d bloggers like this: