Sunday, November 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं तर काही बंधनं राज्यात लागू करु शकतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याची मंत्रिमंडळ बैठकीत परत चर्चा झाली. मास्क वापरण्यासाठी पुन्हा सांगायचं का यावरही चर्चा झाली. त्यावर नागरिकांमध्ये परत मास्क सक्ती होते का अशी चर्चा आहे. मी लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं आहे. टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधनं राज्यात लागू करु शकतो असं वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून दोन, तीन दिवस ती कायम राहील. दुपारी उन्हात जायचं असेल तर छत्री वापरा असा सल्ला अजित पवार यांनी नागरिकांना दिला .
बारामतीमध्ये बिबट्या तसंच लांडगा सफारी सुरु करण्याचं नियोजन असल्याच्या चर्चेसंबंधी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, काहीही बातम्या आहेत. लांडगा सफारी आता लांडगा कोण बघायला येणार आहे. कोल्हे बघायला येतील. अजून त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले ,बारामतीमध्ये बिबट्या सफारी होणार असं आम्ही कधीच म्हटलं नव्हतं. तुम्हीच सर्व देत आहात. मी जुन्नर येथे गेलो होतो. तिथे टीमने आढावा घेतला आहे. आता आम्ही आदित्य ठाकरे आणि तेथील लोकप्रतिनिधींशी एकत्रित चर्चा करणार आहोत. तिथे बिबट्या सफारी करण्याबाबत तरतूद करून काम पूर्ण करणार आहे. तसंच बारामतीमध्ये सिंह किंवा वाघ सफारी सुरु करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply