इंधन दरवाढी विरोधात आम आदमी पक्षाकडून पेट्रोल पंपांवर मूक निदर्शने

पुणे:”बहुत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार!” हा तद्दन खोटा नारा देऊन २०१४ साली सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील कुठल्याही घटकाचा विचार न करता अत्यंत क्रूरपणे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ सुरूच ठेवली आहे. चार राज्यांत निवडणूक असताना १३७ दिवस ठप्प असलेली इंधन दरवाढ निवडणुकीनंतर अक्राळ-विक्राळ रूप घेत सर्वसामान्य जनतेच्या खिशावर अक्षरशः दरोडा टाकत आहे. या सर्वांचा निषेध म्हणून आम आदमी पक्ष पुणे टीमकडून राज्य संघटक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मूक निदर्शने करण्यात आली.

इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी आपकडून एक मोबाईल क्रमांक (Mobile number) देण्यात आला ज्यावर नागरिक मिस कॉल देऊन आपला निषेध नोंदवत होते. अवघ्या २ तासांत सुमारे १००० नागरिकांनी मिस कॉल देऊन आपला निषेध नोंदवला. शहरातील जवळपास १५ पेट्रोल पंपांवर ही मूक निदर्शने करण्यात आली.

इंधन दर कमी करून नागरिकांना महागाईपासून दिलासा देणे ही राज्य आणि केंद्र सरकार दोघांची जबाबदारी आहे परंतु दोन्ही सरकारे मात्र महागाईकडे दुर्लक्ष करून संपूर्ण लक्ष भोंग्याच्या राजकारणाकडे देत आहे. आम आदमी पक्ष या गलिच्छ राजकारणात न अडकता जनतेच्या प्रश्नांवर सातात्याने लढा देत आहे व यापुढे देखील हा लढा अजून तीव्र करण्यात येईल.

“इंधन दरवाढीमुळे सर्वच क्षेत्रात महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशा वेळी सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. आम आदमी पक्ष सद्या चालू असलेल्या धर्मांध राजकारणात न अडकता जनसामान्यांच्या प्रश्नावर काम करण्यात नेहमी अग्रेसर राहिला आहे”, विजय कुंभार, आप राज्य संघटक

“ही निदर्शने ऑफिशियल सुरुवात आहे, जोपर्यंत नागरिकांना इंधन दरवाढीपासून दिलासा मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे निषेध कार्यक्रम सुरू राहतील.”, सेंथील अय्यर – आप इंधन दर वाढ विरोधी मोहीम समन्वयक

यावेळी पियुष हिंगणे, वैशाली डोंगरे, दत्ता जाधव, सुनंदा जाधव, अभिजित गायकवाड, फॅबियन सॅमसन, रोहन रोकडे, वैशाली डोंगरे, विठ्ठल नलावडे, अमोल काळे, ऍड. दत्तात्रय भांगे, आनंद वांजपे, सुशील बोबडे, किरण कांबळे, आरती करंजवणे, ज्योती ताकवले, शेखर ढगे, वैभव, किर्तीसिंग चौधरी, प्रतीक बनसोडे, नितीन अडगले, राहुल म्हस्के, दिनेश मोरे, अभिमान विटकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: