ओऍसिस फर्टीलिटी तर्फे ‘मला आई व्हायचंय’या मोहिमेस सुरुवात

पुणे: राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह २०२२ व ओऍसिस फर्टीलिटीच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने “मला आई व्हायचंय” हि ओऍसिस फर्टीलिटीने महिलांना मातृत्वाच्या प्रवासात साथ देण्याच्या उद्देशाने एक खास मोहीम सुरू केली आहे. या उद्घाटन प्रसंगी पुणे मा. महापौर श्री मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष स्थानी तर पुणे प्रसूती व स्त्रीरोग संस्थेचे अध्यक्ष डॉ पराग बिनीवाले, भारतीय वैद्यकीय संघटना, पुणे (IMA) चे अध्यक्षा डॉ मीनाक्षी देशपांडे, ज्ञानप्रबोधिनी चे मुख्य मार्गदर्शक सौ सविता आणि विवेक कुलकर्णी, इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब भेलके व श्रीमती नलिनी बलकवडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक ओऍसिस फर्टीलिटीचे क्लिनिकल हेड डॉ नीलेश उन्मेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ओऍसिस फर्टीलिटी च्या डॉ भारती खोलापुरे, डॉ. कांचन दुरुगकर,डॉ सायली चव्हाण या देखील उपस्थित होत्या.   या प्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार, गायक डॉ सलील कुलकर्णीचा मातृत्वास स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि ५ गरजू विद्यार्थीना “उन्मेष” शिष्यवृती देण्यात आली.

“मला आई व्हायचंय” या  मोहिमेच्या  अंतर्गत आयव्हीएफसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत मार्गदर्शन करण्यात येते आणि ट्रीटमेंटमधील पहिली सोनोग्राफी हि मोफत स्वरूपात करण्यात येते.

वंध्यत्वामुळे अनेक स्त्रिया ह्या नैराश्येत जातात त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केले जाते . मला आई व्हायचंय” या मोहिमे मार्फत वंध्यत्वाबद्दलची जनजागृती व गुणवत्तापुर्ण उपचार देण्याचा ओऍसिस फर्टीलिटीचा मानस आहे. जनजागृतीच्या माध्यमातून ओऍसिस मार्फत   पुणे आणि पुणे परिसरातील शिरूर , राजगुरुनगर , लोणावळा , इंदापूर  या भागात वंध्यत्व आणि त्याच्या उपचार पद्धती याविषयी मोहीम राबवण्यात येतात.

“मला आई व्हायचंय”  या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ओएसिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड डॉ निलेश बलकवडे म्हणाले, “आम्ही संशोधन, नैतिकता आणि ममत्व यांच्याआधारे उत्कृष्ट उपचार आणि काळजी पुरविण्यासाठी वचनबद्ध आहोत. आहार, व्यायाम पथ्ये, औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादींचा समावेश असलेल्या सर्वांगीण प्रयत्नामुळे प्रजनन उपचारात मोठे यश मिळवता आले आहे.  आम्ही TESE(टी.इ.एस.इ) TESA  (टी.ई.एस.आ) इ सारख्या अत्याधुनिक प्रक्रिया देखील पुरवतो.  त्याद्वारे आम्ही ज्या जोडप्यांमध्ये पुरुष जोडीदाराचे शुक्राणूंची संख्या कमी असते अशा जोडप्यांना देखील  मूल झाल्याचा आनंद देतो, असे प्रजनन विशेषज्ञ डाॅ. नीलेश उन्मेष बलकवडे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: