राज्यात आघाडी सरकारने लागू केलेल्या भारनियमना विरोधात भाजपचे आंदोलन


पुणे: राज्यात सध्या विजेची टंचाई ची समस्या नागरिकांना भरपूर जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे या राज्यातील नागरिकांना विजेची टंचाईची समस्या ही जाणवत आहे. म्हणून आज पुणे शहर भाजपच्या वतीने या महा विकास आघाडी सरकार मुळे नागरिकांना विजेच्या टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे असा आरोप भाजप ने महाविकास आघाडी सरकारवर केला.
ह्या आंदोलनाचे नेतृत्व भाजप पुणेचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले. या आंदोलनाला नगरसेवक राजेश येनपुरे, पुणे शहर भाजपचे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर, धनंजय जाधव, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पुणे शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाच्या वेळी महा विकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला भारनियमन पासून दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जगदीश मुळीक म्हणाले, या राज्यातील जनतेला वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे फक्त या महा विकास आघाडीच्या सरकारमुळे विजेच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे आमचे भाजपचे राज्यात सरकार सत्तेवर असताना कधीही नागरिकांना विजेच्या टंचाईचा सामना करावा लागला नाही. या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला लवकरात लवकर भारनियमा पासून दिलासा द्यावा. अशी आम्ही या आंदोलनातूनच मागणी करत आहोत. असे जगदीश मुळीक म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: