जागतिक वसुंधरा दिन : आर्क युथ ग्रुपच्या युवकांनी राबविला voice for Green Earth हा उपक्रम

पुणे:जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पुणे आर्क युथ ग्रुपच्या युवकांनी आज सकाळी 9 ते 11 या वेळेत पुण्यामध्ये संभाजी पार्क च्या परिसरामध्ये voice for Green Earth हा उपक्रम राबवला.

विश्वाजा कुचेकर,अविनाश अवघडे, प्रिया अवघडे,सिद्धेश मळगी,विनोद गुंजावटे,ऋषिकेश बनसोडे, प्रमिला वाघमारे, नेहा कसबे,अभिजित जाधव,अभिषेक क्षीरसागर,अजय बनसोडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. पुणे शहरातील विविध भागातील 40 युवकांनी सदर उपक्रमामध्ये सहभाग घेतला .

वसुंधरेचे हिरवे लेणे,पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे या आशयाचे पर्यावरण विषयक संदेश पोस्टर घेऊन युवकांनी पर्यावरण विषयी जनजागृती केली.

22 एप्रिल ( जागतिक वसुंधरा दिन ) ते 5 जून ( जागतिक पर्यावरण दिन ) पर्यंत युथ फॉर इकॉलॉजीकल सस्टेंब्लीटी या युवकांच्या राष्ट्रीय नेटवर्कच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पर्यावरण विषयक जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये पुण्यातील आर्क नेटवर्क युथ स्वयंप्रेरणेने सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: