विद्यापीठात आजीवन अध्ययन आणि मानसशास्त्र विभाग आता नव्या इमारतीत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अजीवन अध्ययन व शिक्षणविस्तार आणि मानसशास्त्र विभागाच्या नव्या इमारतींचे उद्घाटन आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अंतरशाखीय अभ्यासाचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, अजीवन अध्ययन व शिक्षण विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय लोखंडे, मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे तसेच अनेक माजी विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यापीठाने कोणतेही नवीन बांधकाम हाती न घेता आधी जे हाती घेतलेले प्रकल्प होते ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तर डॉ. करमळकर म्हणाले, या विभागांकडून आजवर अतिशय उत्तम काम झाले असून भविष्यात काळासोबत नव्याने जाण्यासाठी अंतरशाखीय पध्दतीने आपण आणखी विस्तार कसा करू शकतो आणि नवे अभ्यासक्रम कोणते आणू शकतो, याबाबत पुढील काळात निर्णय घेऊयात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे दोन्हीही विभाग अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. या विभागातील कामाचे व्यापक स्वरूप लक्षात घेत यांना नवीन इमारतीत स्थान देण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: