fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पुण्यातील राहुल पाठक यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या एडिसन पुरस्कारांमध्ये सुवर्ण पुरस्कार

आपातकालीन परिस्थितीत नागरिकांना पिण्यायोग्य पाणी त्वरित उपलब्ध देण्याच्या प्रणालीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल

पुणे, २२ एप्रिल, २०२२ : अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या एडिसन पुरस्कारांमध्ये पुण्यातील नवोन्मेषक – उद्योजक राहुल पाठक यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या पुरस्कारांच्या अंतिम फेरीत स्थान पहिले स्थान मिळवत राहुल पाठक यांच्या अॅक्वा प्लस या संस्थेला  सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे.

पूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी त्वरित उपलब्ध करून देणारी एक अभिनव प्रणाली राहूल यांनी विकसित केली आहे. पाठक यांच्या अॅक्वा प्लसने विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग नैसर्गिक आपत्तीतील गरजूंना होत असून आतापर्यंत युनिसेफ, ऑक्सफॅम जीबी, रेड क्रॉस, रेड आर इंडिया, आयएफआरसी आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्थांमार्फत ही सुविधा गरजुंपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यात आली आहे.

अॅक्वा प्लसने विकसित केलेल्या वॉटर फिल्टर्सचा २००५ साली झालेल्या जम्मू-काश्मीर भूकंपाच्या बचावकार्यात ५ हजार हून अधिक नागीराकांपर्यंत पिण्याचे पाणी पुरवण्यात यशस्वी वापर करण्यात आला होता. उत्तराखंड, जम्मू, केरळ, आसाम आणि चेन्नई महापुरावेळी सुमारे १५०० ठिकाणी अॅक्वा प्लसची पाणी शुद्धीकरण प्रणाली कार्यन्वित करण्यात आली होती. तसेच यातील एका ठिकाणी बसवण्यात आलेल्या अॅक्वा प्लसच्या एका मॉडेलने १० तासांत ७,००० लिटर पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी डोंगराळ भागातील नागरिकांना आपत्कालीन परीस्थित उपलब्ध करून दिले होते.

आजवर सुमारे ५० हून अधिक वेळा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपत्कालीन परिस्थितींमध्ये अॅक्वा प्लसने विकसित केलेल्या पाणी शुद्धीकरण प्रणालीचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. यामध्ये वापरली जाणारी उपकरणे विजेशिवायही चालू शकतात.

दहा वर्षांपूर्वी एडिसन पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती. ही एक वार्षिक स्पर्धा असून त्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवीन उत्पादन व सेवा विकास, विपणन, मानवकेंद्रित रचना व नवनिर्मिती आदींची दाखल घेवून त्यांचा गौरव करण्यात येतो. या सर्व व्यक्ती, संस्था थॉमस अल्वा एडिसन यांच्या कार्याचा वारसा चालवित आहेत. बल्बचा शोध लावून थॉमस एडिसन यांनी जगाला जी दृष्टी दिली तसेच कार्य नवनिर्मिती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती करीत असून त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा नुकताच फोर्ट मायर्स, फ्लोरिडा येथे संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading