fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’मध्‍ये संदीप मेहता महाराजा सयाजीराव गायकवाडच्‍या भूमिकेत

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’ने नुकतेच प्रेक्षकांसाठी आंबेडकर जयंतीवर आधारित स्‍पेशल एपिसोड सादर केला. आता मालिकेमध्‍ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्‍या प्रवेशासह महत्त्वपूर्ण एपिसोड पाहायला मिळणार आहे, लोकप्रिय टेलि‍व्हिजन अभिनेता संदीप मेहता ही भूमिका साकारणार आहे. कथानक ऐतिहासिक घटनेवर लक्ष केंद्रित करेल, जेथे बडोदाचे महाराज सयाजीराव गायकवाड निःपक्षपाती आणि निष्पक्ष स्पर्धेद्वारे भीमराव आंबेडकरांना शिष्यवृत्ती देणार आहेत. केळुसकर गुरुजी भीमरावांची महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी ओळख करून देतात आणि भीमरावांना शिष्यवृत्ती देण्याची विनंती करतात. पण, शिष्यवृत्तीच्या शर्यतीत आणखी एक उमेदवार असल्याचे त्यांच्या लक्षात येते. भीमराव राजाकडे न्याय आणि न्याय्य वागणुकीची मागणी करतात, जेथे राजा शिष्‍यवृत्तीसाठी योग्‍य उमेदवाराची निवड करण्‍याकरिता स्‍पर्धेची घोषणा करतात.

अभिनेता संदीप मेहता यांनी अनेक टेलिव्हिजन मालिका व चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. या मालिकेमधील प्रवेशाबाबत सांगताना संदीप म्‍हणाले, ”ही महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि मी उल्‍लेखनीय पात्र व लक्षवेधक कथानकासाठी प्रशंसा करण्‍यात आलेल्‍या या अत्‍यंत लोकप्रिय मालिकेचा भाग होण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. आम्‍ही शूटिंगला सुरूवात केली आहे आणि अनुभव खूपच लाभदायी ठरला आहे. मला सांगावेसे वाटते की, अशी निपुण भूमिका साकारण्‍याची संधी मिळणे हे माझे भाग्‍य आहे. मी पडद्यावर ही भूमिका व कथानक कशाप्रकारे दिसते हे पाहण्‍यास उत्‍सुक आहे.” एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’मध्‍ये महाराजा सयाजीराव गायकवाडची ऐतिहासिक भूमिका साकारण्‍याबाबत ते पुढे म्‍हणाले, ”मी अनेक संस्‍मरणीय भूमिका साकारल्‍या असल्‍या तरी ही पूर्णत: वेगळी भूमिका आहे. ही महाराज सयाजीराव गायकवाड यांची ऐतिहासिक भूमिका आहे, ज्‍यांनी प्रमुख सामाजिक व शैक्षणिक सुधारणा केल्‍या. त्‍यांचा भेदभाव न करता लोकांची नि:ष्‍पक्षपणे सेवा करण्‍यावर दृढ विश्‍वास होता. महाराज सयाजीराव यांना इतरांचे मूळ विचार माहित होते आणि त्‍यांनी ते कृतीत आणले.”

आगामी एपिसोडबाबत सांगताना भीमराव (अथर्व) म्‍हणाले, ”डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी महाराजा सयाजीरावांचा आदर केला आणि भीमरावांच्या शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक पाठिंब्याबद्दल ते कृतज्ञ होते. आगामी एपिसोड भीमरावांच्या जीवन प्रवासातील या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक भागावर प्रकाश टाकतो. भीमरावांच्या विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराजांनी भीमरावांना त्यांची क्षमता सिद्ध करण्‍यासोबत दीर्घकाळासाठी योग्य संधी देखील दिली. मला खात्री आहे की, भीमरावांच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉईंट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल आणि एक प्रेरणादायी व लक्षवेधक कथानक पाहायला मिळेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading