‘उडचलो’ने जिंकला स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायझेस पुरस्कार २०२२

पुणे : ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचीभारतीय सशस्त्र दलांना व त्यांच्या पूरक सेवांना सेवासुविधा पुरवणारी कंपनीउडचलोला इंडिया एसएमई १०० पुरस्कारांच्या नवव्या आवृत्तीमध्ये भारतातील १०० अव्वल लघु व मध्यम उद्योगांच्या यादीत स्थान मिळाले आहे. भारत सरकारचे माननीय केंद्रीय एमएसएमई मंत्री श्री नारायण राणे आणि माननीय एमएसएमई राज्य मंत्री भानू प्रताप सिंह यांच्या उपस्थितीमध्ये उडचलोच्या टीमला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या मंचावर जवळपास १०० इतर एसएमईना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  उडचलोला भारताच्या सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांचे जीवन त्रासापासून मुक्त करण्याच्या दिशेने केल्या जात असलेल्या अनोख्या प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले आहे. सैनिकांसाठी तिकिटिंगशी संबंधित समस्या सोडवण्यापासून विशेष ग्राहकवर्गासाठी अतिशय डिस्काउंटेड रियल इस्टेट प्रॉपर्टीज उपलब्ध करवून देण्यापर्यंत अनेकवेगवेगळी उत्पादने उडचलोने अतिशय प्रभावी पद्धतीने डिझाईन करूनउपलब्ध करवून दिली आहेत. आपल्या ग्राहकांच्या विश्वासावर उभी असलेली ही कंपनी संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे.

उडचलोचे सीएफओ अबानी झा यांनी सांगितले, “उडचलोला या फोरमकडून मिळालेला सन्मान आणि पुरस्कार आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.  दरवर्षी पुढे जात, आमच्या ग्राहकांच्या बदलत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप मेहनत करत आहोत, आमच्या सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि ग्राहकांना आनंद व समाधान मिळवून देण्यासाठी नवीन धोरणे आणण्याच्या आव्हानांसाठी आमची टीम नेहमीच सज्ज असते. देशाची सेवा करत असलेल्यांना सेवा प्रदान करणारी कंपनी म्हणून उडचलोने विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. आमच्या ग्राहकांसाठी कायम अनुकूल व अनुरूप बनून राहावे व या क्षेत्रात स्वतःची प्रभावी ओळख निर्माण करावी हे आमचे उद्दिष्ट आहे.”

“नव्या, वेगळ्या दृष्टिकोनातून, चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करण्यासाठी आम्ही इतर उद्योजकांना प्रभावित करत आहोत, आमच्या कामाला सन्मानित केले जात आहे ही आमच्यासाठी अतिशय गर्वाची बाब आहे.”

एसएमई फोरम लघु व मध्यम उद्योजकांसाठी भारतातील सर्वात मोठी विनानफा तत्त्वावर काम करणारी संघटना आहे. लघु व मध्यम उद्योजकांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवणेउद्यमशीलता इकोसिस्टिममध्ये होणाऱ्या परिवर्तनाला प्रोत्साहन देणे आणि भारतामध्ये नाविन्यपूर्णवैश्विक स्तरावर स्पर्धेत स्थान मिळवलेल्या एसएमईचे समर्थन करणे व त्यांना ओळख मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: