पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर राडा, राष्ट्रवादी व ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट 

मिटकरींच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ब्राम्हण महासंघाचे आंदोलन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या एका भाषणात ब्राम्हणांची खिल्ली उडवल्याच्या निषेधार्थ आज ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. दुपारी एकच्या सुमारास ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर जमले व जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी राष्ट्रवादी व ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली अन् एकच गोंधळ उडाला. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आनंद दवे म्हणाले, अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध करत आहोत. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, आमच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी कुठल्या चुकीचे भाष्य केलेले नाही. या ब्राह्मण समाजाने चुकीचा अर्थ काढून आज अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध आंदोलन करत आहे आम्ही हे कदापि सहन करणार नाही, असे प्रदीप देशमुख म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: