राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : ऐन उन्हाळ्यात ढगाळ हवामन झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान, आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्‍ये आज विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्‍ये पुढील तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास वेगाने हे वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रदेशात काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान खात्याने केले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: