आम्ही यांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करू -देवेंद्र फडणविस

पुणे :आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विरोध पक्ष भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच भाजपाने बीएमसीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्याविरोधात पोलखोल यात्रेची सुरुवात केली. आज या पोलखोल यात्रेच्या रथावर काही लोकांनी दगडफेक केली. यावर “आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणं अपेक्षित होत. ज्याप्रकारे यांचा बुर्खा फाटतो आहे, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय. पहिल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यातूनच ते असा प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी काहीही केलं तरी यात्रा थांबणार नाही. आम्ही यांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करू”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीला लगावला आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

गृहमंत्र्यांच्या गोपनीय अहवाल बोलताना फडणवीस म्हणाले, जर हा अहवाल गोपनीय आहे तर तो तुमच्याकडे कसा आला? कुठलेच कर्तृत्व सरकार दाखवत नाही आणि असे काहीतरी अहवाल समोर आणून दिशाभूल करायची हेच या सरकारचे काम सुरू असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादीचा अजेंडा बोलावा लागतो. त्यांनी गृहमंत्री म्हणून बोलावं हीच आमची आणि राज्याची अपेक्षा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: