राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत मी बोलणार नाही ते माझ्या अधिकारातही नाही – देवेंद्र फडणवीस

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार आहे. त्यावर विविध नेत्याने प्रतिक्रिया दिल्या आहेत. “राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत मी जास्त बोलणार नाही ते माझ्या अधिकारातही नाही”, असे म्हणत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयी बोलण्याचे टाळले.

आज पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘काल आणि आज’या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावर देवेंद्र फडणविस म्हणाले, महाराष्ट्रात फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांनी पंधरा-वीस वर्षापुर्वी एक पुस्तक लिहल आहे. त्या पु्स्तकात त्यांनी सांगितल आहे की, हिंदूत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खर हिदुत्व कुणाच्या रक्तात आहे. त्यामुळे तुम्ही ते पुस्तक जरूर वाचा त्याची माहिती मी तुम्हाला देईल, असे फडणवीस म्हणाले. मात्र, मी कोणाला बोललो आहे हे त्यांना आणि जनतेलाही समजले आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुंबई भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकार व मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यावर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करण्यात येत आहे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रात्रीच्या अंधारात हा पाठीमागून हल्ला केला आहे. ज्याप्रकारे 2019 ला पाठीत खंजीर खुपसण्याच काम त्यांनी केल तश्याच प्रकारचा हा हल्ला करण्यात आल्याचे लाड म्हणाले.

दरम्यान, या झालेल्या प्रकाराबाबत फडणवीसांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भ्रष्टाचारी अस्वस्थ झाल्याने ते अशाप्रकारचे हल्ले करत आहेत. मात्र, त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही भ्रष्टाचाराची पोलखोल करतच राहणार असून पोलखोल दौरा थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला एका गोष्टीचे समाधान आहे की, आमचा घाव वर्मी बसला आहे. ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना अस्वस्थ वाटतयं त्यामुळे ते आमच्या या यात्रेवर हल्ला करत आहे. मात्र, त्यांना मी स्पष्ट सांगतो की, तुम्ही कितीही हल्ला केला तरी आम्ही भष्टाचार बाहेर काढणे थांबवणार नाही, असा इशारा फडणविस यांनी विरोधकांना दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: