मी फक्त टोपी फेकतो ती कोणाला लागेल माहीत नाही; नाव न घेता चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकशाही किती सुदृढ असते ती कोणालाही पळवून लावू शकतो. हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे पाहिल्यावर कळते. मी कोणाचे नाव घेत नाही. फक्त टोपी फेकतो ती कोणाला लागेल माहीत नाही, असे बोलत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नावं न घेता टोला लगावला.

‘भाजप काल, आज आणि उद्या’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाषण केले.

२०१९ साली शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली. याचाच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी पवारांना टोला लगावला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. रोज सकाळी उठून बोलतात, मीडिया यांना कव्हरेज देते म्हणून यांना वाटते आम्ही जे बोलतो तेच खरे पण असे नसते. ते खरे ‘लवंगी’ आहेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: