Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कडक्याच्या उन्हाळ्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पुणे : अख्खा महाराष्ट्र कडाक्याच्या उन्हाच्या झळा सोसास आहे. काही जिल्ह्याचा पारा तर चाळीस डिग्रीच्या पुढे आहे. अशातच पुणे वेधशाळेने 21 ते 23 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर (IMD) यांनी ट्विट करीत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 तारखेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ज्या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामध्ये बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत सध्या जास्त वाढ झालीआहे. राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading