Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

काळीज पिळवटून टाकणारी घटना; सख्या भावा बहिणीला खेळताना मृत्यूने गाठले   

पुणे : सख्खे बहीण-भाऊ सायकवर खेळत होते. मोठी बहीण पुढे सायकल चालवत होती. तर छोटा भाऊ सायकलच्या मागच्या सीटवर बसला होता. खेळता खेळता हे दोन चिमुकले आत्याकडे जाण्यासाठी निघाले. पण वाटेत कॅनलचा रस्ता आला आणि त्यानेच घात केला. कॅनलच्या रस्त्यावरुन जात असताना सायकल अचानक घसरली. अन् सायकलसकट दोन्ही मुलं कॅनलमध्ये पडली.

काळीज पिळवटून टाकणारी ही घटना कल (दि.18) रात्री हवेली तालुक्यात सोरतापवाडी ग्रामपंचाय हद्दीत घडली आहे. जागृती ढवळे (वय 6) आणि शिवराज ढवळे (वय 3) अशी या दोन्ही मुलांची नावे आहेत. दोघेही मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील देऊळगावचे राहणार आहेत. या घटनेमुळे ढवळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल जागृती आणि शिवराज दोघेजण संध्याकाळी सहा वाजता घराशेजारी सायक खेळत होते. जागृती सायकल चालवत होती. तर शिवराज सायकरच्या मागच्या सीटवर बसला होता. खेळताना ही मुलं जवळच असणाऱ्या आत्याच्या घरी जायला निघाले. मात्र, वाटेत कालवा होता. या कालव्यावरून जाताना पोरांची सायकल घसरली अन् सायकलसकट दोन्ही मुलं कॅनलमध्ये पडली.

बराच वेळ झालं मुलं कुठे दिसून आली नाहीत. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली. आत्याच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या मुलांच्या बेपत्ता होण्याने  पालकही कासावीस झाले. मुलांचा शोध घेत असताना मुलांची सायकल आणि चप्पल जुन्या बेबी कॅनलच्या जवळ आढलून आली. म्हणून मग कालव्यात काही तरुणांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही दोन्ही मुलं जलपर्णी अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर या मुलांना तत्काळ बाहेर काढण्यात आलं वा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading