इन्फिनिक्सने ‘हॉट ११ २०२२’ लॉंच केला

मुंबई : गेल्या वर्षी हॉट ११ व हॉट ११एसला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स हा ट्रांसियॉन ग्रुपचा प्रि‍मिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड ‘हॉट ११ २०२२’च्‍या लॉंचसह आधुनिक काळातील युजर्सना फास्ट अॅण्ड फन अनुभव देण्यास सज्ज आहे. या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत ८,९९९ रूपये आहे आणि २२ एप्रि‍लपासून फ्लिपकार्टवर विक्रीला सुरूवात होईल. ४ जीबी रॅम / ६४ जीबी मेमरी व्हेरिएण्टमध्ये उपलब्ध हॉट ११ तीन आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येईल: पोलार ब्लॅक, सनसेट गोल्ड आणि अरोरा ग्रीन, जो मुख्य रंग असेल.

हॉट ११ २०२२ चे लुक्स व कॅमे-यामध्ये हॉट ११ सिरीजमधील मागील व्हेरिएण्टच्या तुलनेत काही प्रमुख अपडेट्स असतील. यामध्ये उल्लेखनीय वैशिष्ट्ये, उच्च दर्जाचे गेमिंग तंत्रज्ञान, शक्तिशाली प्रोसेसर, आधुनिक ओएस, विशाल क्षमतेची बॅटरी आणि सुधारित कॅमेरा यांचा समावेश आहे, जे ग्राहकांना सर्वोत्तम, सर्वसमावेशक व सर्वांगीण स्मार्टफोन अनुभव देतील.

आकर्षक डिस्प्ले: इन्फिनिक्सच्या सुधारित नवीन हॉट ११ २०२२ मध्ये ६.७ इंच कलर-अॅक्यूरेट डिस्प्लेसह एफएचडी+ रिझॉल्‍युशन आहे. हा पंच-होल डिस्प्ले असलेला किफायतशीर दरामधील एकमेव डिवाईस आहे. मोठ्या स्क्रीनसोबत या स्मार्टफोनमध्ये उच्च दर्जाच्या व्हिज्युअल अनुभवासाठी ५५० नीट्स ब्राइटनेस आणि १५००:१ कॉ`स्ट रेशिओसह विभागातील सर्वात प्रखर व आकर्षक डिस्प्ले आहे. तसेच स्क्रीनवरील किमान बेझल्ससह ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ आणि २०:९ अॅस्पेक्ट रेशिओ सर्वोत्तम व्युईंग अनुभव देतील.

युजर-अनुकूल डिझाइन: फक्त १९५ ग्रॅम वजन असलेला हॉट ११ २०२२ मोठी स्क्रीन असलेला स्मार्टफोन वापरताना आकर्षकता, तसेच कम्फर्ट फॅक्टर लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. प्रि‍मिअम व स्टायलिश दिसणा-या स्मार्टफोनमध्ये फ्लॅट साइड फ्रेम्स आणि साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, हे वैशिष्ट्य असलेला विभागातील हा एकमेव डिवाईस आहे.

उच्च दर्जाची कार्यक्षमता व स्टोरेज: आधुनिक अँड्रॉईड ११ वर संचालित इन्फिनिक्स हॉट ११ २०२२ मध्ये जवळपास १.८२ गिगाहर्टझ स्पीड असलेले सीपीयू व उच्च कार्यक्षम १२ एनएम प्रॉडक्शन प्रोसेससह युनिएसओसी७६१० प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम / ६४ जीबी मेमरी व्हेरिएण्टमध्ये उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये आधुनिक एक्सओएस १० लाइट स्क्रीन देखील आहे, जी युजर्सना सुलभ व गतीशील सॉफ्टवेअर यूएक्ससह सुधारित आयकॉन्स, कलर थीम डिझाइन, रिफ्रेशिंग वॉलपेपर्स आणि सुलभ इंटरफेसचा आनंद देते.

सुधारित कॅमेरा: नवीन हॉट ११ दर्जात्मक कॅमेरा देण्याची इन्फिनिक्सची परंपरा कायम ठेवतो. या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्स एआय ड्युअल रिअर कॅमेरासह २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि समर्पि‍त एलईडी फ्लॅश आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ कॅमेरासह अनेक रेकॉर्डिंग मोड्स आहेत, जसे एचडीआर, ब्रस्ट मोड, टाइम-लॅप्से व्हिडिओ रेकॉर्डिंग मोड आणि स्‍लो मोशन व्हिडिओ मोड, जो युजर्सना स्लो मोशनमध्ये व्हिडिओज कॅप्चर करण्याची सुविधा देतो. स्मार्टफोनच्या पुढील बाजूस ८ मेगापिक्सल एआय इन-डिस्प्ले सेल्‍फी कॅमेरासह सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग मोड्स आहेत.

विशाल क्षमतेची बॅटरी: हॉट ११ मध्ये हेवी-ड्युटी ५००० एमएएच बॅटरी आहे, स्मार्टफोनला दीर्घकाळापर्यंतच्या वापरानंतर देखील कार्यरत ठेवते. बॅटरी जवळपास ३४ दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम, जवळपास १६ तासांचे नॉनस्टॉप व्हिडिओ प्लेबॅक, ६ तासांचे गेमिंग, २२ तासांचे ४जी टॉक-टाइम, ३४ तासांचे म्युझिक प्लेबॅक आणि २८ तासांचे वेब सर्फिंग देते. स्मार्टफोनमध्ये १० वॅट चार्ज सपोर्टसह टाइप सी केबल असेल, ज्यामुळे युजर्सना दीर्घकाळापर्यंत त्यांच्या आवड` मनोरंजनाचा आनंद घेता येईल, ज्यासाठी वारंवार फोन रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: