रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे – चित्रा वाघ
पुणे: शिवसेनेचे नेते डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेनं काही दिवसांपूर्वी तिला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फुस लावल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं. या प्रकरणात शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ लोकांवरती गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 19 फेब्रुवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या पीडितेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिल्याचं खळबळजळक दावा 2-3 दिवसांपूर्वी केला होता.त्यावर शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत, असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या,मी पीडितेला सर्वतोपरी मदतचं केली. तरीही माझ्यावरच खोटे आरोप करण्यात आल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना मेल/लेखी अर्जाद्वारे केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच, पोलीस सखोल चौकशी करतील ही अपेक्षा असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या.
Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) Tweeted:
रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत
मी पिडीतेला सर्वतोपरी मदतचं केली तरीही माझ्यावरच खोटे आरोप केले गेलेत
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ही मागणी मी पुणे पोलिसआयुक्त ना मेल/लेखी अर्जाद्वारे केलीये
पोलिस सखोल चौकशी करतील हि अपेक्षा https://t.co/7Kch7znhFN https://twitter.com/ChitraKWagh/status/1515949886524456963?s=20&t=bRwnl1FmWX5ackXQVXlmxA
