विकासकामांच्या नोंदी होत नसल्यामुळे पालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍तांनी विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना फटकारले

पुणे: महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या नोंदी जीआयएस’ प्रणालीमध्ये होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महापालिकेच्या तीनही अतिरिक्‍त आयुक्‍तांनी सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना फैलावर घेत फटकारले आहे. तसेच जुन्या आणि यापुढे करण्यात येणाऱ्या नव्या कामांच्या नोंदी त्वरित जीआयएस प्रणाली’च्या बेस मॅपवर करण्यात याव्यात, असे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या विकासकामांच्या अद्ययावत माहितीच्या नोंदी करण्यासाठी टेंडर युटीलिटी इंटरप्राईजेस माध्यमातून जी.आय.एस. प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जेणेकरून महापालिकेच्या विविध विभागांकडील विकासकामांमध्ये प्रशासकीय निर्णय घेताना गती येणार असून, त्याबाबतची भौगोलिक माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्वरित प्राप्त होणार असल्याने प्रशासकीय निर्णय घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍तांनी सर्व विभागांना 2017 ते 2022 या आर्थिक वर्षातील स’ यादीसह सर्व पूर्ण झालेली कामांची नोंद जीआयएस’ प्रणालीवरवर करून अहवाल सादर करा, असे सांगण्यात आले आहे. तसेच जीआयएस प्रणालीच्या बाबत काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्‍यक असल्याबाबतही बजावले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: